Nandurbar News: आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्याने तरुणाची हत्या; धक्कादायक घटनेनं नंदुरबार हादरलं

आंतरधर्मीय प्रेमविवाहातून एका तरुणाची धारदार शस्त्र भोकसून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.
 Nandurbar News
Nandurbar NewsSaam Tv

सागर निकवाडे

Nandurbar News: नंदुरबार शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आंतरधर्मीय प्रेमविवाहातून एका तरुणाची धारदार शस्त्र भोकसून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. नंदुरबार शहरातील अतिशय वर्दळीचा समजल्या जाणाऱ्या मच्छी बाजार परिसरालगत काल सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. (Latest Nandurbar News)

मिळालेल्या माहितीनुसार, बहिणीला पळवून नेत विवाह केल्याच्या रागातून मुलीच्या भावाने तिच्या पतीची हत्या केली आहे. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. सदर घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधिक्षकांसह सर्व पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी सांगितल्यानुसार, घटनेनंतर आरोपी हा स्वत:पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. मात्र अधिक खबरदारीसाठी नंदुरबारमध्ये आज अतिरिक्त कुमक सह मोठा पोलीस फौजफाटा तैणात करण्यात आला आहे.

 Nandurbar News
Nandurbar : क्रूरतेचा कळस ! मूल होत नसल्याने सुनेला अमानुष मारहाण; धक्कादायक घटनेनं नंदुरबार हादरलं

प्रेमप्रकरण आणि कौटुंबिक कलहातून गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. सिन्नर येथे दोन जावांमधील भांडणात एकीची हत्या करण्यात आली आहे. शुक्रवारी पीडितेचे जाऊबाईबोरबर भांडण झाले होते. पीडिता ही नवविवाहित होती त्यामुळे कपाटात ठेवलेल्या सोन्याच्या डब्ब्यावरून त्यांच्यात भांडण झालं होतं. याचा राग आल्याने मोठ्या जाऊबाईने नवविवाहितेची हत्या केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com