नंदुरबार : रेशन दुकानांमधून निकृष्ट धान्याचा पुरवठा!

तांदळामध्ये सिमेंट सदृश्य पदार्थ, गहू आणि विमल गुटख्याच्या पुड्या
नंदुरबार : रेशन दुकानांमधून निकृष्ट धान्याचा पुरवठा!
नंदुरबार : रेशन दुकानांमधून निकृष्ट धान्याचा पुरवठा!SaamTVnews

नंदुरबार : धडगाव तालुक्यातील सोन बुद्रुक गावातील रेशन दुकानावर पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेतून मार्च महिन्याचे मोफत धान्य वितरीत होत असताना अजब प्रकार पाहायला मिळाला आहे. रेशन लाभार्थ्यांना दिला जाणारा तांदूळ भेसळयुक्त आणि अत्यंत निकृष्ट दर्जाचा असल्याचे समोर आले आहे.

हे देखील पहा :

तांदळात सिमेंट सदृश्य पदार्थ, गहू आणि विमल गुटख्याच्या पुड्या आढळून आल्याने लाभार्थ्यांनी रेशन दुकानदारांचा विरोध करत धान्य घेण्यास नकार दिला. याबाबत रेशन दुकानदार मगन पावरा यांनीही प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. धडगाव सारख्या अतिदुर्गम भागात गरीब जनतेला खरोखरच मोफत राशन द्यायचं असेल तर शासनाने चांगल्या दर्जाचे द्यावे अशी मागणी केली आहे.

नंदुरबार : रेशन दुकानांमधून निकृष्ट धान्याचा पुरवठा!
अकोल्यात आयुक्तांच्या कार्यालयासमोर फोडले हांडे; पाण्यासाठी महिला आक्रमक

सदर तांदूळ की गहू हे ओळखणे कठीण आहे, याला खावे कसे असा प्रश्न उपस्थित करत, दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. धडगाव तालुक्याचे तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांना याबाबत विचारले असता पुरवठा निरीक्षक यांना पाठवून याबाबत चौकशी करणार असल्याची माहिती दिली आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायत व आदिवासी जनजागृती टीमच्या वतीने तहसीलदारांना तक्रारी अर्ज देऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com