पारंपरिक गीतांनी पावसासाठी वरुणराजाला साकडे

पारंपरिक गीतांनी पावसासाठी वरुणराजाला साकडे
पारंपरिक गीतांनी पावसासाठी वरुणराजाला साकडे

तळोदा (नंदुरबार) : धव्या न पिव्या नंदी रथ खय खय वाजे, राणी काजळ उनी माय पावनी, काय काय मांगे अशी पारंपरिक गीते म्हणत शेतकरी कुटुंबातील खानदेशी गल्लीतील महिला भगिनींनी पावसासाठी वरुणराजाला साकडे घातले. त्यामुळे पाणी मागण्याचा परंपरागत पूजाअर्चा व भाबड्या आशेचे दर्शन नव्या पिढीला देखील झाले. त्यात पाऊस लांबला असल्याने खरिपाच्या पेरण्यादेखील होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे महिला वर्गाने पुढाकार घेऊन पावसाला साकडे घालणे सुरू केले आहे. (nandurbar-taloda-news-women-singing-Traditional-songs-to-Varun-Raja-for-rain)

जुलै महिना होऊन आठ दिवस झाले तरीदेखील पेरणी योग्य पाऊस तळोदा परिसरात झाला नाही. पूर्ण मृग नक्षत्र कोरडे गेले त्यामुळे पेरण्या देखील खोळंबल्या असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कापूस, सोयाबीन, ज्वारी या पिकांच्या पेरण्या अजूनही करता आलेल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यामुळे दररोज आभाळाकडे नजरा लावून चातकासारखी पावसाची वाट पाहत आहेत.

पारंपरिक गीतांनी पावसासाठी वरुणराजाला साकडे
नंदुरबारच्या अनिलकडून युरोपातील ‘माउंट एल्ब्रूस’ सर

राणी काजल मातेची आराधना

तळोदा तालुक्यात राणीपूर जवळील राणी काजल मातेची आराधना करून वरुणराजाला साकडे घालण्याची परंपरा आहे. पाणी मागण्याचा या परंपरेत प्रत्येक बोलीभाषेत विविध गाणीदेखील रचण्यात आलेली आहेत. त्याच गाण्यांच्या आधार घेत खानदेशी गल्लीतील शेतकरी कुटुंबातील महिलांनी मागील तीन दिवसांपासून वरुण राजाला प्रसन्न करण्यासाठी रात्री एकत्रित येत परंपरागत गीतांचा साहाय्याने पूजाअर्चा सुरू केली आहे. त्यामुळे वरुणराजा प्रसन्न होऊन पाऊस लवकर बरसेल अशी भाबडी आशा महिलांना लागून आहे.

घागरीला धरून फेर धरले

जुन्या तांब्याच्या घागरवर नारळ ठेवून पाटावर गव्हाची आरास करून घागरीला धरून फेर धरले जातात व गोलाकार फिरून घागर फिरवली जाते. त्याचवेळी विविध गीते सादर केली जातात. अश्या पारंपरिक पद्धतीने महिला रात्री एकत्रित येऊन पावसासाठी आळवणी करीत आहेत. यात आपोआप गीते व परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मौखिक पद्धतीने जात असल्याचे महिलांनी सांगितले. यावेळी निर्मला कर्णकार, इंदूबाई सूर्यवंशी, साधना वाघ, लक्ष्मीबाई माळी, भिकी सूर्यवंशी, चंद्रकला कर्णकार, प्रतिभा माळी, ताराबाई सूर्यवंशी, अनिता शेंडे, पुष्पाबाई सूर्यवंशी, उज्वला वाघ आदी महिला व गल्लीतील लहान बालके उपस्थित होते.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com