Nandurbar Cyclone News: नंदुरबार जिल्ह्यात चक्रीवादळाचा हैदोस, 35 आदिवासी कुटुंबांचे घरे उद्ध्वस्त

नंदुरबार जिल्ह्यात चक्रीवादळाचा हैदोस, 35 आदिवासी कुटुंबांचे घरे उद्ध्वस्त
Nandurbar Cyclone News
Nandurbar Cyclone NewsSaam Tv

>> सागर निकवाडे

Nandurbar Cyclone News: नंदुरबार जिल्ह्यात चक्रीवादळाने हैदोस घातला आहे. चक्रीवादळात 35 हून अधिक आदिवासी कुटुंबांचे घरांचे नुकसान झालं आहे. तर अनेक घरांचे पत्रे देखील उडाले आहेत.

यासोबतच घरात साठवून ठेवलेला धान्य इतर उपयोगी वस्तू हे पूर्ण पाण्यात भिजली आहेत. तळोदा तालुक्यातील रापापुर परिसरात आज झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर आला त्यातच वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे अनेक झाडे ही कोलमडून पडले आहेत.

Nandurbar Cyclone News
Explainer: RBI ने 2000 च्या नोटा चलनातून बाद का केल्या? 'ही' आहेत 6 मोठी कारणे

चक्रीवादळात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतात पाणी शिरलं आहे. यातच घराचे नुकसान झाले असून आदिवासी कुटुंब हे आता उघड्यावर आले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात अतिवृष्टी झाल्याने आदिवासी हताश झाले आहेत. (Latest Marathi News)

वादळी वाऱ्यांमुळे घरांचे आणि विजेचा खांबांचे मोठ्या प्रमाणात नुकसान विजेचे खांब कोसळल्याने परिसरात विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. (NANDURBAR)

Nandurbar Cyclone News
Raosaheb Danve on Employment: रोजगाराच्या मुद्द्यावर रावसाहेब दानवे यांचं महत्वाचं वक्तव्य, म्हणाले...

यातच चक्रीवादळात घराचे नुकसान झालेल्याना लवकरात लवकर पंचनामे करून शासनाने मदत करावी, अशी मागणी आता आदिवासी कुटुंब करू लागले आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com