Narayan Rane on Uddhav Thackeray: 'उद्धव ठाकरे महाफडतूस माणूस', नारायण राणे यांचा हल्लाबोल

Narayan Rane : उद्धव ठाकरे महाफडतूस माणूस : नारायण राणे
Narayan Rane on Uddhav Thackeray
Narayan Rane on Uddhav ThackeraySaam TV

Narayan Rane: ठाण्यात शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याला मारहाण केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला होता. त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत म्हटलं होतं की, 'फडतूस गृहमंत्र्याला पदावर राहण्याचा अधिकार नाही.' उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले आहेत की, 'उद्धव ठाकरे हे महाफडतूस माणूस आहे.'

Narayan Rane on Uddhav Thackeray: राणेंचा उद्धव ठाकरे यांना इशारा

फडतूस या शब्दावरून पेटलेल्या राजकारणावर बोलताना नारायण राणे म्हणाले की, ''इतकं सगळं करून ही तुम्ही (उद्धव ठाकरे) बाहेर आहात. याचं एकच कारण आहे, ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचं नाव. त्यांच्यामुळे तुम्ही बाहेर राहिला आहात. नाही तर हे शक्य झालं नसतं.'' ते म्हणाले, ''भाजपचा कोणताही नेता आणि कार्यकर्त्यांसाठी अशी भाषा पुन्हा वापरली तर याचे परिणाम भोगावे लागतील.'' (Latest Marathi News)

Narayan Rane on Uddhav Thackeray
Hanuman Jayanti Advisory: हनुमान जयंतीला समाजकंटकावर करडी नजर; केंद्रीय गृहमंत्रालयाची सर्व राज्यांसाठी अॅडव्हायझरी

Uddhav Thackeray: काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

ठाकरे गटाच्या कार्यकर्ता रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. मंगळवारी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रोशनी यांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. ज्यात ते म्हणाले होते की, 'गेल्या आठवड्यात कोर्टाने नपुंसक हा शब्द वापरला होता. जीवाला जीव देणाऱ्या शिवसेनेचे हे ठाणे आहे. जे आता शिवसैनिक नाचतात, त्यांना बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. गुंड महिलांनी हल्ला केला'.

Narayan Rane on Uddhav Thackeray
Married Women Facts: नजरे मिलाना, नजरे चुराना ! विवाहित स्त्रीची परपुरुषाबद्दल शारीरिक भावना काय असते?

यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता, फडतूस गृहमंत्र्याला पदावर राहण्याचा अधिकार नाही, असं म्हटलं होतं. ज्यावरून सुरू झालेलं राजकरण हे अद्यापही सुरूच आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com