
Mumbai: हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त देशभरातील नेत्यांनी सोशल मीडियावरुन मानवंदना दिली आहे. अनेक नेत्यांनी सोशल मीडियावरुन त्यांच्या भावना व्यक्त केली असतानाच केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी सोशल मीडियावरुन बाळासाहेबांची माफी मागितली आहे, त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. (Balasaheb Thackeray)
केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तुम्ही आजारी असताना मला तुम्हाला भेटायचं होतं. तुम्हाला शेवटचं पाहायचं होतं. पण साहेब, मी तुम्हाला शेवटचा नमस्कारही करू शकलो नाही. मला क्षमा करा, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
नारायण राणे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर दोन पानी पत्र पोस्ट केले आहे. या पत्रात त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. शेवटच्या काळात बाळासाहेब आजारी असताना त्यांना भेटण्यासाठी… त्यांना शेवटचं पाहण्यासाठी मनाची कशी घालमेल झाली होती. आपण कसे अस्वस्थ झालो होतो, याचं वर्णन राणे यांनी या पत्रातून केलं आहे.
नारायण राणेंच भावनिक पत्र..
आदरणीय बाळासाहेबांच्या निधनाचं वृत्त मी टेलिव्हिजनवर पाहिलं. माझ्या हृदयात भावनांचा कल्लोळ उसळला होता आणि त्यांच्यासोबत घालवलेल्या कितीतरी क्षणांच्या आठवणीनं माझे डोळे ओलावले होते. माझ्या आत उचंबळून येणाऱ्या भावनांना मी कागदावर शब्दांतून मांडण्याचा प्रयत्न केला.
सेना सत्तेवर आहे की नाही या गोष्टीचा त्यांच्यावर कधी परिणामच झाला नाही. ते नेहमीच आपली बोलण्यावागण्याची राजेशाही शैली तशीच राखून असत. त्यांच्यासारखे खरोखर तेच एकमेव होते. आपल्या काम करण्याच्या खास पद्धतीमुळे त्यांना राष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठा मिळालेली होती.
या पत्रात शेवटी नारायण राणे आपल्या शेवटच्या दिवसात त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. मला वाटलं ते याही वेळेस मृत्यूला चकवून बरे होतील. पण ते आपल्यातून निघून गेले. मी घेतलेल्या निर्णयानं त्यांना खूप यातना झाल्या असणार आणि त्याबद्दल मला आजन्म दुःख राहणार आहे. पण त्या परिस्थितीत माझा नाईलाज होता. काही लोकांच्या मुळं मला तो निर्णय घेणं भाग पडलं. असो. आता त्याबद्दल बोलून काही फायदा नाही, असेही ते म्हणतात.
"त्यांना शेवटचं पहाण्याची संधी मला मिळू शकली नाही आणि ते आपल्यातून निघून गेले. साहेब! मी आपल्याला शेवटचा नमस्कारही करू शकलो नाही. मला क्षमा करा,"असे म्हणत पत्राच्या शेवटी बाळासाहेबांची माफी मागितली आहे. (Narayan Rane)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.