हजर नव्हे..! पत्रकारांशी अधिक न बोलता नारायण राणे निघून गेले

हजर नव्हे..! पत्रकारांशी अधिक न बोलता नारायण राणे निघून गेले
Narayan Rane

राजेश भोस्तेकर

रायगड : हजर नव्हे..! मी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी येथे आलाे हाेताे असे सांगत केंद्रीय मंत्री नारायण राणे Narayan Rane हे पत्रकारांशी अधिक न बोलता अलीबाग येथील पाेलिस अधीक्षक कार्यालय परिसरातून निघून गेले. आज दुपारी तीनच्या सुमारास राणे हे त्यांच्यावरील दाखल झालेल्या गुन्ह्या संदर्भात पाेलिसांना तपास कार्यात सहकार्य करण्यासाठी येथे आले हाेते असे त्यांच्या वकीलांनी नमूद केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thackeray यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर नाशिक येथे पहिला गुन्हा नाेंद झाला हाेता. त्यानंतर पाेलिसांनी राणेंना संगमेश्वर येथे ताब्यात घेऊन महाड न्यायालयात हजर केले हाेते. न्यायालयाने राणेंना जामीन देताना त्यांनी ३० आॅगस्ट आणि १३ सप्टेंबरला अलीबाग पाेलिसांत हजर राहण्याची अट घातली हाेती. पहिल्या तारखेस मंत्री राणे हे उपस्थित राहिले नाहीत. त्यांनी वकीलांच्या माध्यमातून गैरहजेरीचे कारण पाेलिसांना दिले हाेते.

Narayan Rane
राणेंची चुप्पी; माध्यमांकडे कटाक्षही टाकला नाही

आज (मंगळवार, ता, १३) ते स्वतः अलीबाग पाेलिस अधीक्षक कार्यालयात हजर राहिले. त्यांचा जबाब नाेंदविण्यात आल्याची माहिती त्यांचे वकील ऍड संग्राम देसाई यांनी दिली. देसाई म्हणाले न्यायालयाच्या आदेशानुसार आज मंत्री राणे हे पाेलिस अधीक्षक कार्यालयात आले. त्यांनी तपासी अंमलदार मिलिंद खोपडे यांच्याकडे त्यांचा जबाब नोंदविला. पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले आहेत.

Narayan Rane
साकीनाक्यातील क्रूरकर्त्यास देहदंडाची शिक्षा द्या : उदयनराजे

पोलिसांना पूर्ण सहकार्य नारायण राणे यांनी केले आहे. आवाज तपासणी नमुने आज घेण्यात आलेले नाहीत. नमुने लागले तर देणार आहोत. या प्रकरणी आता पुढची काेणतीही तारीख दिलेली नसल्याचे ऍड संग्राम देसाई यांनी स्पष्ट केले.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com