Narayan Rane
Narayan RaneSaam Tv

केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं ते भाकित खरं ठरणार? चर्चांना उधाण

एकनाथ शिंदे यांनी ठाकरे सरकारविरोधात बंड पुकारलं.

मुंबई: विधान परिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाकरे सरकारविरोधात बंड पुकारलं. एकनाथ शिंदे शिवसेनेच्या 15 ते 20 आमदारांना घेऊन गुजरात येथील सूरतमध्ये थांबले असल्याची माहिती आहे. अशातच शिंदेंनी जर भाजपमध्ये प्रवेश केला तर ठाकरे सरकार (Uddhav Thackeray) पडण्याची शक्यता वर्तवली जातेय. दरम्यान, या सर्व घडामोडीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेलं भाकित खरे ठरत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. (BJP Shivsena latest News Marathi)

Narayan Rane
एकनाथ शिंदेंसोबत आमदार नितीन देशमुख गुजरातला, पण पत्नीने पोलीस ठाण्यात दिली मिसिंगची तक्रार!

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एप्रिल महिन्यात वाशिम येथील एका कार्यक्रमात एक विधान केलं होतं. जून महिन्यात राज्यात मोठा राजकीय भूकंप येईल आणि महाविकास आघाडी सरकार कोसळेल असं भाकित नारायण राणे यांनी केलं होतं. आज एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे नारायण राणे यांनी केलेलं हे भाकित खरं होणार. अशी चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Narayan Rane
राज्यात पुन्हा भाजप-शिवसेना सरकार येणार का?; एकनाथ शिंदेंनी ठेवला प्रस्ताव

काय म्हणाले होते राणे?

'आमच्या कोकणात जून महिन्यात वादळ येत असते, त्या वादळात मोठमोठ्या फांद्या असलेली झाडे मुळासहित उन्मळून पडतात. हे सरकारही फांदीसारखे आहे. ठाकरे सरकार हे या झाडाचे मूळ नाही, ती फांदीच आहे. तेव्हा हे सरकारही येत्या जून महिन्याच्या राजकीय वादळात उन्मळून पडेल', असा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वाशीम येथील पत्रकार परिषदेत केला होता.

इतकंच नाही तर, हे सरकार आहे, असे वाटते तुम्हाला? मुख्यमंत्री मंत्रालयात बसत नाहीत. कॅबिनेट बैठकीला जात नाहीत. अधिवेशनात किती मिनिटे जातात? एकेदिवशी कॅबिनेटला तीन मिनिटे आले, नंतर शेवटी परत आले. मिटिंगला न बसता सगळे विषय त्यांना माहिती पडतात. अधिवेशनात अंतिम आठवड्यात उत्तर दिले. कलानगरच्या नाक्यावरचे भाषण विधिमंडळात केले, असा टोला राणेंनी लगावला होता.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com