uday samant narayan rane
uday samant narayan rane

DPC त राणे- शिवसैनिकांत बाचाबाची; सामंतांचे शांततेचे आवाहन

आजच्या सभेत काय हाेणार याकडे सिंधूदूर्गवासियांचे लक्ष लागून राहिले आहे.

सिंधुदुर्ग : जिल्हा नियोजन समितीची सभा ओरोस येथे सुरु असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जिल्हा नियोजनचे अध्यक्ष आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर नियोजनचा निधी परस्पर विरोधी पक्षातून आलेल्या सरपंच, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांना देत असल्याचा गंभीर आरोप केला. त्यामुळे सभागृहात गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघाच्या शेतकऱ्यांची थकीत रक्कमेवरुन राणे आणि संदेश पारकर यांच्यात जंपुली. Narayan Rane Uday Samant Dpc meeting Sindhudurg

आज (मंगळवार) सकाळी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस प्रारंभ झाला. या बैठकीस केंद्रीय मंत्री नारायण राणे, खासदार विनायक राऊत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य उपस्थित आहेत. बैठकीच्या प्रारंभीच मंत्री राणेंनी पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर निधी वाटपावरुन आराेप केले.

राणेंनी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचा दाखला देत पालकमंत्री उदय सामंतांना घेरले. यावेळी आमदार नितेश राणे आणि शिवसेनेचे नियोजन समितीचे सदस्य यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी उदय सामंत यांनी सेनेच्या सदस्यांना गप्प राहण्याचे आवाहन केलं. नियोजनाचा निधी कुठे ही परस्पर नियोजन समितीच्या सभे शिवाय दिला जात नसल्याच सांगितले. पेपर मधील बातमी ही शिवसेनेच्या मेळाव्यात बोललो तेव्हाची होती. त्यावेळी असा उल्लेख मी कुठे केला नसल्याचं उदय सामंत यांनी सांगत वादावर पडदा टाकण्याच काम केलं.

edited by : siddharth latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com