DPDC बैठकीत गाेंधळ; राणेंचा पालकमंत्री उदय सामंतांवर राेष

त्यापार्श्वभुमीवर आजच्या सभेत काय हाेणार याकडे सिंधूदूर्गवासियांचे लक्ष लागून राहिले आहे.
sindhudurg bjp protest against gurdian minister uday samant
sindhudurg bjp protest against gurdian minister uday samant

सिंधुदुर्ग : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस गोंधळाने प्रारंभ झालेला आहे. पालकमंत्री उदय सामंत हे परस्पर जिल्हा नियोजनचा निधी आपल्या पक्षाच्या सदस्यांना देतात असा आराेप केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी बैठकीत केला. त्यावरुन काही गाेंधळ निर्माण झाला. येथे हाेत असलेल्या जिल्हा नियाेजन समितीच्या बैठकीस केंद्रीय मंत्री नारायण राणे, खासदार विनायक राऊत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य उपस्थित आहेत. या सभेत केवळ पालकमंत्री आले आणि गेले असे आता हाेणार नाही असा इशारा आमदार नितेश राणे यांनी यापुर्वीच दिला हाेता. त्यापार्श्वभुमीवर आजच्या सभेत काय हाेणार याकडे सिंधूदूर्गवासियांचे लक्ष लागून राहिले आहे.

sindhudurg bjp protest against gurdian minister uday samant
DCC तील राजकारणावरुन शंभूराज देसाई नाराज; NCP ला दिला इशारा

पालकमंत्री उदय सामंत यांच्या विरोधात उपोषण

आज (मंगळवार) जिल्हा नियोजनची बैठक होत असताना कुडाळ नगरपंचायतचे माजी नगरसेवक आणि जिल्हा नियोजनचे भाजपचे कुडाळमधील सदस्य पालकमंत्री उदय सामंत यांच्या विरोधात जिल्हा नियोजन सभागृहाच्या बाहेर एक दिवसीय लाक्षणिक उपोषणास बसले आहेत.

जिल्हा नियोजन नगरोथ्थानमधून दिला जाणारा विकास निधी पक्षीय राजकारण करून फक्त शिवसेनेच्याच नगरसेवकांना दिला जातो असा आरोप आंदाेलकांनी पालकमंत्र्यांवर केला आहे. त्यामुळे आज भाजपच्या वतीने जिल्हा नियोजन सभागृहाच्या बाहेर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण छेडण्यात येत आहे. यावेळी आंदाेलकांच्या वतीने उद्धवा अजब तुझे सरकार असे भजन गात महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com