nitesh rane sandesh parkar
nitesh rane sandesh parkar

पैसे बुडवणाऱ्यांनी शिकवू नये; DPC त राणें पारकरांची जुंपली

त्यापार्श्वभुमीवर आजच्या सभेत काय हाेणार याकडे सिंधूदूर्गवासियांचे लक्ष लागून राहिले आहे.

सिंधुदुर्ग : दूध उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे बुडणार नाही याची जबाबदारी आम्ही घेऊ. पैसे बुडवणाऱ्यांनी हे आम्हाला शिकवू नये असा टोला केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी शिवसनेचे संदेश पारकर यांना जिल्हा नियाेजन समितीच्या बैठकीत लगावला. यावेळी आमदार नितेश राणेंनी तुम्हांला लोकांनी नाकारलं आणि तुम्ही लोकांना फसवलं त्याची लिस्ट आम्ही काढू असे म्हणातच सभागृहात गोंधळ निर्माण झाला. narayan rane nitesh rane sandesh parkar dpc meeting sindhudurg uday samant

आज (मंगळवार) सकाळी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस प्रारंभ झाला. या बैठकीस केंद्रीय मंत्री नारायण राणे, खासदार विनायक राऊत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य उपस्थित आहेत. बैठकीच्या प्रारंभीच मंत्री राणेंनी पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर निधी वाटपावरुन राेष व्यक्त केला.

nitesh rane sandesh parkar
...तर गाेव्यातील कॅसिनो बंद करु; संजय राऊत

सिंधुदुर्ग जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघाच्या शेतकऱ्यांची थकीत रक्कम प्रतीभा कृषी प्रक्रिया लिमिटेड कोडोली या संस्थेने दुधापोटी येणे असलेली बाकी रक्कम २ कोटी ७७ लाख रुपये गेले चार वर्षे देण्यास टाळाटाळ करून येथील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत आणलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी आजच्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेत मुद्दा समोर आला. या मुद्यावरुन सभागृहात गदारोळ झाला. त्यामुळे संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणीतुन मुक्तता मिळावी म्हणून नियोजन समितीत मुद्दा उपस्थित करण्यात आला.

यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सभागृहात ज्यांच्यावर आरोप केला जातो त्यांची नाव घ्यावीत आम्ही जबाबदारी घेऊ असं म्हटलं. पैसे बुडवणाऱ्यांनी हे आरोप करू नयेत असा टाेला शिवसेनेचे नियोजन समितीचे सदस्य असलेले संदेश पारकरांना लगावला. तेव्हा पारकरांनी हा सदस्यांचा अपमान असल्याचे म्हटलं. यावेळी आमदार नितेश राणे यांनी तुम्ही लोकांना लूटल्याची लिस्ट देऊ म्हणून तर कणकवलीतील लोकांनी पाडलं असा टोला संदेश पारकर यांना लगावला.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com