राऊत दलाली करत फिरतोय, राणेंचा टाेला; आँडिओ क्लिप तपासा : राऊत

सिंधुदुर्ग वैद्यकिय महाविद्यालायावरून रंगला राजकीय कलगीतुरा.
राऊत दलाली करत फिरतोय, राणेंचा टाेला; आँडिओ क्लिप तपासा : राऊत
narayan rane vinayak raut

सिंधुदूर्ग : सिंधुदूर्गातील वैद्यकीय महाविद्यालायावरून सध्या राजकीय कलगीतुरा रंगलेला पहायला मिळतोय. केंद्रीय मंत्री नारायण राणें यांनी आपण या वैद्यकीय महाविद्यालयास खोडा आणला नसल्याचा दावा केला आहे. विकासाच्या बाबतीत मी कधी खोडा घालणार नाही असे राणेंनी स्पष्ट केले आहे. narayan rane vinayak raut medical college sindhudurg

narayan rane vinayak raut
MRF MoGrip FMSCI इंडियन नॅशनल रॅलीत तनिका शानभाग द्वितीय

सिंधुदूर्ग जिल्ह्याची आज (मंगळवार) आेरस येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. या बैठकीस केंद्रीय मंत्री नारायण राणे, खासदार विनायक राऊत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य उपस्थित आहेत. या बैठकीत शिवसेना विरुद्ध राणे असा कलगीतुरा पहावयास मिळाला. त्यानंतर दाेन्ही गटाकडून स्वतंत्र पत्रकार परिषद झाली.

नारायण राणे यांनी वैद्यकीय महाविद्यालयाबाबत मी कधीच खाेडा घातला नाही असे स्पष्ट केले. खासदार विनायक राऊत सगळीकडे दलाली करत फिरतोय अशी टिप्पणी नारायण राणेंनी केली.

खासदार विनायक राऊत म्हणाले वैद्यकीय महाविद्यालय विरोधात आपण मंत्र्याकडे पुन्हा एकदा तक्रार देणार आहोत. सिंधुदूर्गातील महाविद्यालयाची सर्व तयारी सुसज्ज आहे. एमईआरपी अँक्ट प्रमाणे शेवटचे अपिल दोन दिवसात केले जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे या संदर्भातील तक्रार सुद्धा केली जाईल. केंद्रीय आरोग्य विभागाची यंत्रणा कशी बोलते त्याच्या आँडिओ क्लिप सुद्दा आपण सादर करणार असल्याचे खासदार राऊत यांनी नमूद केले.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com