ST Strike : खेळवत ठेवणे हेच शरद पवारांचं काम - नारायण राणे

'ST कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवरती मी केंद्राच्या माध्यमातून मार्ग काढण्यासाठी लवकरच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार.'
ST Strike : खेळवत ठेवणे हेच शरद पवारांचं काम - नारायण राणे
Sharad Pawar/Narayan RaneSaamTV

सावंतवाडी - ST कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे राज्य सरकार गांभीर्याने न पाहता केवळ त्यांना खेळवत असल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST Staff) प्रश्नांवरती मी केंद्राच्या माध्यमातून मार्ग काढण्यासाठी लवकरच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांची (PM Narendra Modi and Home Minister Amit Shah) भेट घेणार असल्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते नारायण राणें यांनी (Narayan Rane) ST कर्मचाऱ्यांना दिले.

हे देखील पहा -

राज्यातील महाविकास आघाडी सरकार बनविल ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) अधिकार वाणीने ST कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत सरकारला सांगू शकले असते, मात्र ते तसे करणार नाहीत कारण खेळवत ठेवणे हेच त्यांचे काम असल्याची बोचरी टीका राणेंनी पवारांवरती केली.

Sharad Pawar/Narayan Rane
'काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह भाजपमधील मुस्लीमांनी 11 डिसेंबरच्या मोर्चात मुसलमान म्हणून सामील व्हा'

सावंतवाडी (Sawantwadi) येथील येथील कार्यकर्ता मेळाव्यामध्ये आले असता नारायण राणेंनी ST आगाराजवळ सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला भेट दिली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलताना पवारांवरती टीका केली. यावेळी राणेंसोबत BJP जिल्हाध्यक्ष राजन तेली, जि.प. अध्यक्षा संजना सावंत, महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com