नारायण राणेंचे राऊतांना प्रत्युत्तर; तेव्हा संजय राऊतांना कळेल..

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर काल पार पडला.
नारायण राणेंचे राऊतांना प्रत्युत्तर; तेव्हा संजय राऊतांना कळेल..
नारायण राणेंचे राऊतांना प्रत्युत्तर; तेव्हा संजय राऊतांना कळेल.. saam tv

विहंग ठाकूर

मुंबई : ''कोणतंही खातं छोटं किंवा मोठं नसतं. मी जेव्हा खात्याचा कार्यभार पाहीन आणि मी जेंव्हा या खात्याला न्याय देईन तेव्हा संजय राऊतांना कळेल की हे खातं किती महत्त्वाचं आहे. अशा शब्दांत नवनिर्वाचित केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut0 यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. मध्यमाशी संवाद साधताना त्यांनी संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. (Narayan Rane's reply to Raut; Then Sanjay Raut will know ..)

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर काल पार पडला. पंतप्रधान मोदींच्या मंत्रीमंडळात नारायण राणे यांना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. मंत्रिमंडळ विस्तराचा सोहळा राष्ट्रपती भवनात पार पडला. यात सर्वात शपथ सर्वात प्रथम नारायण राणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र नारायण मिळालेल्या खात्यावर शिवसेनेनेही यावर प्रतिक्रिया दिली असून राणेंची उंची दिलेल्या जबाबदारीपेक्षा मोठी असल्याचे प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली होती.

तसेच, नारायण राणे यांना केंद्रात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे मंत्रिपद दिलं आहे. नारायण राणे राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यांनी नेक खात्यांचा कारभार सांभाळला आहे. नारायण राणे यांची उंची पदापेक्षा मोठी आहे. अशी टिप्पणी त्यांनी केली होती. इतकेच नव्हे तर, आता राज्यातच नाही तर संपूर्ण देशात, कोरोना महामारीत कोलमडलेल्या उद्योगांना संजीवनी देण्याच आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्याचं आव्हान आता त्यांच्यासमोर असेल, असेही यावेळी संजय राऊत यांनी म्हटले.

नारायण राणेंचे राऊतांना प्रत्युत्तर; तेव्हा संजय राऊतांना कळेल..
आईचा खून करुन काळीज खाणा-यास न्यायालयाने सुनावली फाशी

दरम्यान, मंत्रिपद मिळाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन करण्यासाठी कॉल केला होता का असा प्रश्न विचारण्यात आला. ''उद्धव ठाकरेंचं मन ऐवढं मोठं नाही. मला मंत्रीपद मिळाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले नाही,'' असे म्हणत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. मात्र शरद पवार यांनी मला फोन केला होता. केंद्रात चांगले काम करा, असं त्यांनी मला सांगितल. अशी माहिती त्यांनी त्यावेळी दिली.

Edited By- Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com