Kolhapur: फार्महाऊसमध्ये ड्रग्सचा कारखाना उध्वस्त, अडीच कोटींचा माल जप्त

पोलिसांनी ढोलगरवाडी येथील एका फार्म हाऊसवर छापा टाकला आहे.
Kolhapur: फार्महाऊसमध्ये ड्रग्सचा कारखाना उध्वस्त, अडीच कोटींचा माल जप्त
Kolhapur: फार्महाऊसमध्ये ड्रग्सचा कारखाना उध्वस्त, अडीच कोटींचा माल जप्तSaam Tv

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्याच्या चंदगड (Chandgad, Kolhapur) तालुक्यातील ढोलगरवाडी Dholgarwadi याठिकाणी गेल्या तीन दिवसांपासून मुंबई पोलीस Mumbai Police ठाण मांडून बसले आहेत. पोलिसांनी ढोलगरवाडी येथील एका फार्म हाऊसवर छापा टाकला आहे. गेल्या तीन दिवसांपासून याठिकाणी शोध मोहीम सुरू होती. तब्बल 72 तासांच्या चौकशीनंतर पोलिसांनी ढोलगरवाडी गावातून एकाला अटक केली आहे. या प्रकरणात एका हाय प्रोफाइल वकिलाचा (lawyer) समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाकडून (NCB) कोट्यवधींचा माल जप्त करण्यात आला आहे.

हे देखील पहा-

संबंधित कारवाईबाबत पोलिसांनी सुरुवातीपासूनच कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती. तीन दिवस झडती घेतली आणि त्यानंतर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ढोलगरवाडीतील एका फार्महाऊसवर पशुपालनाच्या आड एम.डी. नावाचा ड्रग्स तयार करण्याचा कारखाना सुरू होता अशी माहिती होती.

नेमकं प्रकरण काय आहे?

अलीकडेच, मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडे Criminal Investigation Department एका महिलेविरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी संबंधित महिलेस ताब्यात घेऊन चौकशी केली असता, तिने माहिती दिली होती की, चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडी येथील फार्म हाऊसवर एमडी नावाचा अमली पदार्थांचा साठा आहे. अशी माहिती दिली होती. अशी माहिती मिळाल्यानंतर, मुंबई पोलिसांनी ढोलगरवाडी येथील संबंधित फार्म हाऊसवर छापा Police Raid टाकला होता. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून मुंबई पोलीसांनी याठिकाणी शोधमोहीम राबवली. पोलिसांनी हाय प्रोफाइल ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

Kolhapur: फार्महाऊसमध्ये ड्रग्सचा कारखाना उध्वस्त, अडीच कोटींचा माल जप्त
श्रीमंताशी लग्न करण्याचा मोह भोवला; पठ्याने लग्नाच्या नावाखाली 130 महिलांना विकले

आपल्या गावालगतच असलेल्या फार्म हाऊसवर अशा प्रकारचा व्यवसाय चालत आहे अशी कल्पना देखील ग्रामस्थांनी केली नव्हती. परंतु संबंधीत व्यक्तीचा सुरवातीला पोल्ट्री फार्मचा उद्योग होता त्यानंतर अलीकडच्या काळात येथे मक्यापासून कडबा कुटी तयार करण्याचे काम सुरु असल्याचे सांगितले जात होते. याठिकाणी बकरी आणि घोडेही पाळले होते तर, दररोज काही मजूर नियमितपणे कामाला होते अशी माहिती आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com