Nashik: महापालिका हद्दीतील म्हाडाच्या घरांमध्ये 1000 कोटींचा घोटाळा?

खाजगी विकासकाने बांधलेल्या घरकुलात 20 टक्के जागा राखीव ठेवणे किंवा त्या तुलनेत शासनाला भूखंड देणे बंधनकारक आहे.
Nashik: महापालिका हद्दीतील म्हाडाच्या घरांमध्ये 1000 कोटींचा घोटाळा?
Nashik Muncipal CorporationSaam TV

नाशिक: नाशिक महापालिका (Nashik Muncipal Corporation) हद्दीतील म्हाडासाठी राखीव फ्लॅट्सचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. म्हाडामध्ये राखीव फ्लॅट्समध्ये 700 ते 1000 कोटींचा घोटाळा असल्याचं बोलले जात आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विटरद्वारे पुन्हा आरोप केला आहे. नाशिक महापालिका याचा हिशोब द्यायला तयार नाही. घोटाळ्याची तक्रार पोलीस खात्याकडे करावीच लागेल असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. तर म्हाडासाठीच्या राखीव फ्लॅट्समध्ये कुठलाही घोटाळा नाही असे स्पष्टीकरण महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिले आहे. खाजगी विकासकाने बांधलेल्या घरकुलात 20 टक्के जागा राखीव ठेवणे किंवा त्या तुलनेत शासनाला भूखंड देणे बंधनकारक आहे. 

मात्र नगररचना अधिकाऱ्यांनी आदेशाचे उल्लंघन केल्याचा जितेंद्र आव्हाड यांवी आरोप केला आहे. आर्थिक दुर्बल घटकांना घरं दिल्याशिवाय प्रकल्पाला ओसी देऊ नये, या कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला आहे. नियमांचं उल्लंघन झालं असेल तर दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करू असे पालिका आयुक्तांनी स्पष्टीकरण दिले आहे. बिल्डरनं खरी माहिती दडवली असल्यास बिल्डरवर देखील कारवाई होणार असे पालिका आयुक्तांची सांगितले आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com