Nashik: क्रिकेट खेळताना चक्कर येऊन अवघ्या 15 वर्षीय मुलाचा मृत्यू!
Nashik: क्रिकेट खेळताना चक्कर येऊन अवघ्या 15 वर्षीय मुलाचा मृत्यू!सागर गायकवाड

Nashik: क्रिकेट खेळताना चक्कर येऊन अवघ्या 15 वर्षीय मुलाचा मृत्यू!

नाशिक येथील नवीन नाशकात क्रिकेट खेळताना अचानक चक्कर आल्याने एका 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

सागर गायकवाड

नाशिक : नाशिक Nashik येथील नवीन नाशकात क्रिकेट Cricket खेळताना अचानक चक्कर आल्याने एका 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  श्रेयस सुधीर ढोरे अस या मुलाचे नाव आहे.

हे देखील पहा-

मिळालेल्या माहितीनुसार, हा रणभूमी मैदान Ranbhumi Ground याठिकाणी क्रिकेट खेळत होता. त्याला अचानक चक्कर आल्याने तो बेशुद्ध पडला. खेळत असणाऱ्या मित्राने त्याला चक्कर येऊन पडताना पाहिले अन् मैदानातील सावलीच्या ठिकाणी नेले. त्याने जवळच्या बाटलीत  असलेले पाणी त्याच्या चेहेऱ्यावर शिंपडले.

Nashik: क्रिकेट खेळताना चक्कर येऊन अवघ्या 15 वर्षीय मुलाचा मृत्यू!
Jammu Kashmir मध्ये चकमक; लष्करचे 5 जवान शहीद

मात्र तो कुठल्याच प्रकारचा प्रतिसाद देत नसल्याचे लक्षात येताच, तेथील युवकांनी उचलून त्याला तात्काळ उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.