Nashik : भाजप पदाधिकाऱ्याची हत्या, चार दिवसात जिल्ह्यात तिसरा खून

नाशिक शहर हत्येच्या घटनेनं हादरल असून अवघ्या 4 दिवसात नाशिकमधील ही तिसरी हत्येची घटना आहे.
Nashik : भाजप पदाधिकाऱ्याची हत्या, चार दिवसात जिल्ह्यात तिसरा खून
Nashik : भाजप पदाधिकाऱ्याची हत्या, चार दिवसात जिल्ह्यात तिसरा खूनअभिजित सोनवणे

अभिजित सोनवणे

नाशिक : नाशिकमध्ये हत्येचे सत्र सुरुच असल्याचे दिसून येत आहे. नाशिमधील भाजपचे पदाधिकारी अमोल इघे (Nashik) यांची हत्या करण्यात आली आहे. अमोल इघे हे सातपूर भाजप मंडळ अध्यक्ष होते. सातपूरच्या कार्बन नाका या परिसरामध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. भाजप पदाधिकाऱ्यांची हत्या झाल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे.

हे देखील पहा-

भाजपचे पदाधिकारी अमोल इघे यांचा मृतदेह सातपूरच्या कार्बन नाका परिसरामध्ये सकाळी आढळून आला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठवण्यात आला आहे. या प्रकऱणी पोलीस अधिक तपास करत आहेत. राजकीय पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

Nashik : भाजप पदाधिकाऱ्याची हत्या, चार दिवसात जिल्ह्यात तिसरा खून
मुंबईवरील 26/11 हल्ल्यातील वीर शहिदांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

राजकीय पदाधिकाऱ्याची निर्घृणपणे हत्या कऱण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला नाशिक मध्ये आरपीआयच्या महिला पदाधिकारी पूजा आंबेकर यांची हत्या करण्यात आली होती. यानंतर आता भाजप पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आली आहे. महिन्याभरामध्ये झालेल्या राजकीय पदाधिकाऱ्यांच्या हत्येने नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com