
अजय सोनवणे, प्रतिनिधी
नमोकार तीर्थक्षेत्रा समोरील मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. कार आणि कंटेनरमध्ये हा भीषण अपघात झाला असून या दुर्घटनेत कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला. या भयंकर अपघाताने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिकच्या (Nashik) चांदवड तालुक्यातील नमोकार तिर्थक्षेत्रासमोर कार कंटेनरचा भीषण अपघात झाला. यामध्ये कारमधील चार जण जागीच ठार झाले आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
कारमधील मृत युवक हे धुळे (Dhule) जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. ते सर्वजण नाशिककडून धुळ्याकडे चालले होते. अपघातग्रस्तांची ओळख मात्र अद्याप पटली नाही. घटनेची माहिती मिळताच वडणेरभैरव पोलिसांसह, सोमा टोलवेज कंपनीचे अपघातग्रस्त पथक घटनास्थळी पोहचले.
ही धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातानंतर काही वेळ महामार्गही ठप्प झाला होता. पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने महामार्गावरील वाहतूक सुरळित करण्यात आली आहे. भीषण अपघातात चार तरुणांचा दुर्देवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
समृद्धीवर भीषण अपघात...
समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg Accident) अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील घुईखेड नजिक अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात मध्यप्रदेशातील महिला पोलिस निरीक्षक गंभीर जखमी झाल्या आहेत. मध्य प्रदेश पोलीस दोन आरोपींना घेऊन समृध्दी महामार्गाने नयनपुरकडे जात असताना हा अपघात झालाय. पहाटेच्या वेळी चालकाला झोप लागल्याने चारचाकी थेट दुभाजकाला धडकली. (Latest Marathi News)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.