Nashik Bus Accident: पुण्याहून निघालेल्या एसटी बसला अपघात, मनमाडमध्ये प्रवाशांनी भरलेली भरधाव बस उलटली

Nashik Bus Accident: अपघातात एकजण गंभीर जखमी झाला आहे.
Nashik Bus Accident
Nashik Bus Accident Saam TV

अजय सोनवणे

Nashik Bus Accident : नाशिकमध्ये मनमाड-मालेगाव राज्य मार्गावर एसटी बसला भीषण अपघात झाला आहे. भरधाव एसटी बस पलटी झाली आहे. मालेगावपासून काही अंतरावरील राजस्थान ढाब्याजवळ हा अपघात झाला आहे. अपघातात एकजण गंभीर जखमी झाला आहे.

पुण्याहून शिंदखेडा येथे ही बस जात होती. बसचे लायनर चिकटल्यामुळे ब्रेक न लागल्याने बस पलटी झाली. बसमध्ये एकूण 41 प्रवासी प्रवास करत होते.  (Latest Marathi News)

जखमींना मालेगावच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती समजताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. (Accident News)

Nashik Bus Accident
Maharashtra Weather Update: राज्यावर अवकाळीचं सावट! मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्याला पुढील 2 दिवस 'ऑरेंज' अलर्ट

पुण्यात भीषण अपघात

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर सात वाहने एकमेकांवर आदळून भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. महामार्गावरील खोपोली एक्झिटजवळ हा अपघात झाला आहे. ज्यामध्ये एक ट्रक, स्विफ्ट, इर्टिगा अशी सात वाहने एकमेकांवर आदळली आहेत.

Nashik Bus Accident
Mumbai- Goa Highway Accident: हदयद्रावक! ट्रक आणि रिक्षाचा भीषण अपघात, महिलेचा दुर्देवी मृत्यू; 2 जखमी

या अपघाताची माहिती मिळताच मदत कार्याला सुरूवात केली असून अपघातात ४ ज जखमी झाल्याचे समोर आले आहे. तसेच या अपघातात गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com