महाराष्ट्र हादरला! नाशिकमध्ये २० वर्षीय तरुणीची जमावाकडून हत्या, ३ घरेही जाळली

जमिनीच्या वादामधून हा प्रकार घडला असल्याची प्राथामिक माहिती आहे.
Nashik Igatpuri Crime
Nashik Igatpuri CrimeSaam Tv

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील ईगतपुरी तालुक्यातून माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. इगतपुरी तालुक्यातील अधरवड येथील कातकरी वस्तीत २० वर्षीय तरुणीची जमावाकडून हत्या करण्यात आली आहे. ही संतापजनक घटना शनिवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. (Nashik Igatpuri Crime News)

Nashik Igatpuri Crime
भयंकर! गुप्तधनासाठी पत्नीचा बळी देण्याचा प्रयत्न, पतीसह सहा जणांवर गुन्हा

जमिनीच्या वादामधून हा प्रकार घडला असल्याची प्राथामिक माहिती आहे. मिळालेल्या प्राथामिक माहितीनुसार, बारशिंगवे (ता. इगतपुरी) या भागातील हे टोळके असून या टोळक्यात आदिवासी समाजाचे १० ते २० जण आहेत. जमिनीच्या वादातून या टोळक्याने शनिवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास कातकरी वस्तीवर हल्ला केला.

Nashik Igatpuri Crime
नंदुरबारमध्ये भुरट्या चोरांचा सुळसुळाट; आठ शेती पंपाच्या मोटर चोरीला

या हल्ल्यात २० वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आली. इतकंच नाही तर, वस्तीतील ३ घरे सुद्धा या टोळक्याने जाळली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपासकार्याला वेगाने सुरुवात करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com