
//Amazon Publisher's Services //End of Amazon Publisher's Services Code
अजय सोनावणे, प्रतिनिधी
Nashik Malegaon Crime News: सख्ख्या भावानेच लहान भावाला संपवल्याची धक्कादायक आणि तितकीच हादरवुन टाकणारी घटना मालेगावमधून (Malegaon) समोर आली आहे. वारंवार होणाऱ्या भांडणामुळे हे क्रूर कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. (Crime News In Marathi)
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सख्ख्या भावानेच चाकू भोकसून २३ वर्षीय तरुण भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या (Nashik) मालेगावातील नूरबागमध्ये समोर आली. जाविद अहमद मोहम्मद जमील असे मृत तरुणाचे नाव आहे. तर मुद्दसीर अहमद मोहम्मद जमील असे आरोपी भावाचे नाव आहे.
मृत जाविद व आरोपीमध्ये सतत भांडणे होत होती. या वादातूनच मुद्दसीरने जाविदचा खून केला. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांवनी धाव घेत आरोपी भावाला अटक केली. त्याच्या विरोधात गुन्हाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. (Crime Story)
अल्पवयीन मुलीची आत्महत्या...
कल्याणमध्ये (Kalyan) अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीची काही जण छेड काढत असल्याने ती मानसिक तणावात होती. यातूनच तिने जीवन संपल्याची माहिती समोर आली आहे. कल्याण पश्चिम परिसरातील ही घटना आहे. कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.