Nashik Crime: अनैतिक संबंधासाठी प्रेयसीच्या पतीची हत्या; पोलिसांनी २ तासात प्रियकरला घेतलं ताब्यात

Extramarital Affairs Crime: आठ दिवसांपूर्वी जेलरोड येथील पंचक येथे राहणारा ३० वर्षाचा तरुण बेपत्ता झाला होता. यासंदर्भात त्याच्या नातेवाईकांनी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली होती.
Extramarital affairs
Extramarital affairs saam Tv

Extramarital Affairs:

आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ३० वर्षीय तरुणाचा मृतदेह पोलिसांना छिन्न-विच्छिन्न अवस्थेत आढळून आला. नाशिक रोड परिसरातील दसक शिवारात असलेल्या मलनिस्सारण केंद्राजवळ तरुणाचा मृतदेह आढळला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात हत्याचा गुन्हा दाखल केला. प्रेम प्रकरणावरून या तरुणाची हत्या झाली असल्याचा संशय पोलिसांना आहे. तोच धागा पकडत नाशिक पोलिसांनी अवघ्या २ तासात पत्नी आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतलंय. (Latest News on Crime)

या हत्येप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ दिवसांपूर्वी जेलरोड येथील पंचक येथे राहणारा ३० वर्षाचा तरुण बेपत्ता झाला होता. यासंदर्भात त्याच्या नातेवाईकांनी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली होती. सोमवारी या युवकाचा मृतदेह दसक शिवारात असलेल्या मलनिस्सारण केंद्राजवळ आढळून आला. सुरुवातीला पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असता सुरुवातीला ओळख पटली नाही.

पोलिसांनी तपास केला असता मृतदेहाची ओळख पटली. बेपत्ता झालेल्या तरुणाचा खून हा प्रेम प्रकरणावरून झालेला असावा असा संशय पोलिसांना आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी अवघे २ तासात खून झालेल्या युवकाच्या पत्नीला आणि तिच्या प्रियकराला संशयावरून ताब्यात घेतलं आहे. त्याचबरोबर पोलिसांनी इतर दोन-तीन व्यक्तींना सुद्धा चौकशीसाठी बोलवलं आहे. नाशिक रोड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे सुभाष घेगलमल यांचे सह पथकांनी ही कामगीरी केली.

काही दिवसांपूर्वी मुंबईतील सांताक्रूझ परिसरातही अनैतिक संबंधांतून पत्नीनं पतीला विष देत त्याची हत्या केली. त्यासाठी आरोपी महिलेने प्रियकराची मदत घेतल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलं होतं. अनैतिक संबंधांमध्ये नवरा हा अडथळा ठरत होता. हा अडथळा दूर करण्यासाठी महिलेनं प्रियकरासोबत असा कट आखला होता.

Extramarital affairs
Chhatrapati Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ! अनैतिक संबंधातून एकाचा खून; मामा- भाच्याला अटक

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com