Nashik Crime News: खळबळजनक! एकाच शहरातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांची आत्महत्या; घटनेमागचं रहस्य काय?

2 Policemen Of Nashik Ended Their Lives: मोहन बोरसे हे पोलिस मुख्यालयात चालक पदावक कार्यरत होते. तर शिवराम निकम सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते.
Nashik Crime News
Nashik Crime NewsSaam TV

तबरेज शेख

Nashik News: नाशिक शहरातून एक मोठी खळबळजनक घटाना समोर आली आहे. शहरातील दोन पोलिसांनी आत्महत्या केलीये. लागोपाठ आत्महत्येच्या या घटना घडल्या आहेत. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडालीये. (Nashik News)

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक शहरात दोन दिवसात दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यात आणखीन धक्कादायक बाब म्हणजे नाशिक पोलीस मुख्यालयात ऑन ड्युटी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. मोहन बोरसे (वय 40) आणि शिवराम निकम (वय 57)अशी आत्महत्या केलेल्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

Nashik Crime News
Crime News: नात्याला काळीमा! सरकारी नोकरीसाठी तरुणाने केलं खळबळजनक कृत्य, परिसरही हादरला

मोहन बोरसे हे पोलिस मुख्यालयात चालक पदावर कार्यरत होते. तर शिवराम निकम सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते. बोरसे यांनी ऑन ड्युटी असताना आपलं जीवन संपवलं आहे. तसेच निकमांनी आपल्या राहत्या घारी गळफास घेत आत्महत्या केलीये. या घटनांमुळे पोलीस कुटुंबीयांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. पोलिसांनी त्यांचे शव ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेत.

शहरातील पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांचा एकाचवेळी मृत्यू झाल्याने चर्चेला उधाण आलं आहे. त्यांनी ही आत्महत्या नेमकी का केली. या दोघांच्या आत्महत्येचा काही संबंध आहे का? त्यांच्यावर कोणत्या गोष्टींचा दबाव होता का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Nashik Crime News
Nashik Accident News: धावत्या रेल्वेत पाच महिन्यांच्या बाळाचा मृत्यू; प्रवासात नेमकं काय घडलं?

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com