Crime: प्रेमविवाहानंतर तरुणी घरी आली; मामाच्‍या मदतीने केला तिच्‍या भावाचा खून

प्रेमविवाहानंतर तरुणी घरी आली; मामाच्‍या मदतीने केला तिच्‍या भावाचा खून
Nashik Crime News
Nashik Crime NewsSaam tv

तरबेज शेख

नाशिक : प्रेमविवाह केलेली तरुणी घरी आली नाही; म्हणून प्रियकराने मामाच्या मदतीने तरुणीच्या भावाचा खुन केल्याचा धक्कादायक प्रकार (Nashik) नाशिकच्या मायको दवाखाना फुलेनगर परिसर येथे समोर आला आहे. रात्री उशिरापर्यंत पंचवटी पोलिस (Police) ठाण्यात या खुनाबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. (Nashik Crime News)

Nashik Crime News
Jalgaon: मृत्यूच्या दारातून आल्या परत; बिबट्याच्‍या भीतीने नदीत उडी, साठ किमीपर्यंत वाहिली महिला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रवी सय्यद या तरुणाच्या बहिणीसोबत संशयित विशाल ताराळकर याचे प्रेमसंबध आहेत. तरुणी काही दिवसांपासून तिच्या घरी असल्याने संशयिताने तिला फोन करत घरी ये नाही तर तुझ्या भावाचा गेम करेल अशी धमकी दिली होती. त्यांनतर संशयित विशाल ताराळकर, किरण कोकाटे या दोघांनी रवी सय्यद याच्यावर (Crime) हल्ला केला. यात रवीचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात (Hospital) खून झालेल्या रविचा मृतदेह आणला असता नातेवाईकांनी गर्दी केल्याने तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे खबरदारी म्हणून सरकारवाडा पोलिसांकडून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दोन संशयीत ताब्‍यात

पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून खुनातील दोघा संशयित आरोपींना अटक केली असून पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक डॉ. सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेबाबत अधिक तपास सुरु आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com