मृतदेह रस्त्यावर ठेवत खूनाचा नाेंदविला निषेध; भराडवाडीत तणाव

या खूनामुळे नाशिक शहरातील पोलिसांच्या गस्तीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मृतदेह रस्त्यावर ठेवत खूनाचा नाेंदविला निषेध; भराडवाडीत तणाव
citizens gathered near bharadwadi road nashik

- सागर गायकवाड

नाशिक Crime News : नाशिक (nashik) शहरात रात्री राजेश शिंदे या भाजी व्यापाऱ्याचा खून झाला. त्या घटनेच्या निषेधार्थ शिंदेचे नातेवाईक आणी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने आज (बुधवार) पेठरोडवरील भराडवाडी परिसरात जमा झाले. त्यांनी शिंदे यांचा मृतदेह रस्त्यावर ठेवत रास्ता रोको केला. यामुळे काही काळ भराडवाडी परिसरात तणाव निर्माण झाला.

citizens gathered near bharadwadi road nashik
NCP कार्यालय फाेडल्याची दखल अजित पवारांनी घेतली, म्हणाले..!

राजेश उर्फ राजू वकील शिंदे याचा खून झाल्याने त्याचे नातेवाईक आणि स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत. हल्लेखाेरांवर तातडीने कारवाई झाली पाहिजे अशी भावना व्यक्त करीत स्थानिकांनी रास्ता राेकाे केला. पाेलिसांनी याची माहिती समजताच ते घटनास्थळी आले. जमावाची त्यांनी समजूत काढण्यास प्रारंभ केला आहे.

दरम्यान खूनाची माहिती समजताच रात्रीच सहाय्यक पोलिस आयुक्त मधुकर गावित, पंचवटी येथील वरिष्ठ पोलिस निरीक्षक सिताराम कोल्हे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनस्थळी धाव घेत तपास यंत्रणा राबविण्यास प्रारंभ केला.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com