पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीचं मध्यरात्री भयंकर कृत्य; नाशिकमधील थरारक घटना

चरित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची गळा चिरून पती हत्या केली.
Nashik Crime
Nashik CrimeSaam TV

तरबेज शेख

नाशिक : नाशिक जिल्ह्यातून एक भयंकर घटना समोर आली आहे. चरित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची गळा चिरून पती हत्या केली. ही धक्कादायक घटना अंबड शिवारातील चुंचाळे येथे घडली. संगीता सचिन पवार (वय २५) असे या खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. पत्नीची हत्या करून पती फरार झाला होता. मात्र, तो औरंगाबाद वाळुज पोलिस ठाण्यात स्वतः हजर झाला. (Nashik Crime News)

Nashik Crime
पुणे हादरलं! तरुणीने बोलण सोडलं म्हणून तरुणाला राग अनावर; त्यानंतर...

अंबड पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतलं आहे. सचिन अशोक पवार असं आरोपी पतीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सचिन पवार (मूळ राहणार खिर्डी ता. खुलदाबाद औरंगाबाद) हा पत्नी संगीता सोबत चार दिवसांपूर्वी अंबड चुंचाळे शिवारात राहण्यास आला होता. रविवारी रात्री त्याचे पत्नी संगीतासोबत वाद झाले. त्यानंतर त्याने पत्नीचा गळा चिरून खून केला.

दरम्यान, पत्नीची हत्या करून आरोपी सचिन हा घराला बाहेरून कडी लावून फरार झाला. त्यानंतर पहाटे औरंगाबाद येथील वाळुंज पोलिस स्टेशन मध्ये तो स्वतः हजर झाला. येथील पोलिसांनी अंबड पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. (Nashik Marathi News)

Nashik Crime
सर्वात मोठी बातमी : बंडखोरी केलेल्या शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात हाय अलर्ट

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा संगीता ही रक्ताच्या थारोळ्यात आढळून आली. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविचछेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी अंबड पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com