Nashik : आईला कामावरून काढल्यानं तरुण भडकला; मित्रांच्या मदतीने केलं भयंकर कृत्य

नाशिकमध्ये हत्येचे (Murder) सत्र सुरूच आहे. नाशिक शहरात रक्तपाताच्या घटनेची मंगळवारी सकाळी पुन्हा पुनरावृत्ती झाली आहे.
Nashik Crime News
Nashik Crime News SaamTv

तरबेज शेख

नाशिक : नाशिकमध्ये हत्येचे (Murder) सत्र सुरूच आहे. नाशिक शहरात रक्तपाताच्या घटनेची मंगळवारी सकाळी पुन्हा पुनरावृत्ती झाली आहे. आईला कामावरुन काढल्याने संतप्त मुलाने तीन मित्रांच्या मदतीने कंपनीतील व्यवस्थापकाची धारदार शस्त्राने वार करुन हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. नाशिकच्या (Nashik) अंबड येथील गरवारे पाँईंटजवळील आहेर इंडस्ट्रिजमध्ये घडली आहे. गेल्या १८ दिवसात शहरात ८ जणांचे मुडदे पाडण्यात आले आहेत. त्यामुळे नाशिककर भीतीच्या सावटाखाली आले आहेत. (Nashik Crime News In Marathi )

Nashik Crime News
बीड: अवैध गर्भपात प्रकरणात गर्भलिंग निदान केलेल्या ठिकाणाहून धक्कादायक माहिती उघड

मिळालेल्या माहितीनुसार, नंदकुमार निवृत्ती आहेर (५०) असे मृत व्यवस्थापकाचे नाव आहे. अविनाश सुर्यवंशी असे पकडलेल्या संशयिताचे नाव असून त्याचे मित्र व्यवस्थापकाची चॉपर आणि तलवारीने हत्या करताना एक घाव त्याच्या पायाला लागला. त्यात ताे जबर जखमी हाेऊन पळून गेल्यावर पाथर्डी फाटा येथील रुग्णालयात पत्रा लागल्याचे सांगून उपचार घेत असताना त्याला पाेलिसांनी (Police) ताब्यात घेतले. त्याचावर उपचार सुरु असून अन्य तिघा संशयितांचा तपास लागला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेतील मृत आहेर हे आहेर इंडस्ट्रिजमध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत हाेते. त्यांनी गेल्या काही दिवसांपासून घटनेतील चार संशयितांपैकी एका तरुणाच्या आईला कामावरुन काढून टाकले हाेते. त्याचाच राग मनात धरुन संशयितांनी आहेर यांची दिनचर्या जाणून घेतली.

त्यानंतर मंगळवारी सकाळी दहा वाजता या महिलेच्या मुलासह त्याच्या तिघा मित्रांनी आहेर यांना गेटजवळ अडवून तलवार व चाॅपरने वार केले. त्यात गंभीर जखमी आहेर यांनी कंपनीतील कामगार सचिन व अमाेल यांना हाक मारली. ते दाेघे आल्यावर त्यांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. तसेच प्रकृती चिंताजनक असल्याने दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डाेक्यावर आणि पाेटावर जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.

Nashik Crime News
हिजाब परिधान करून वर्गात प्रवेश; 24 विद्यार्थिनींबाबत महाविद्यालयाचा मोठा निर्णय!

दरम्यान,आहेर यांची हत्या करताना तिघांपैकी एकाच्या चाॅपरचा वार संशयित सूर्यवंशी यांच्या पाेटरीवर बसला. त्यात ताे रक्तबंबाळ झाला. चाैघेही दुचाकीवरुन पाथर्ढी फाट्याच्या दिशेने पळाले. त्यानंतर सूर्यवंशी हा उपचारासाठी एका रुग्णालयात गेला. पाेलिसांनी घटनास्थळ व विश्लेषणावरुन परिसरातील सर्वच सरकारी व खासगी रुग्णालयांना सतर्क केले.

तसेच डाॅक्टरांनाही कळवण्यात आले. त्यानुसार रुग्णालयात उपचारार्थ आलेल्या सूर्यवंशीची माहिती पाेलिसांना कळवण्यात आली. त्यानंतर त्याला पकडण्यात आले. ताे देखील गंभीर जखमी असून या घटनेत ताे बचावला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com