Nashik Crime News: नाशिकमध्ये बिल्डरच्या घरी चोरी; तब्बल साडे आठ लाखांचा ऐवज लंपास... परिसरात खळबळ

Nashik Latest News: भद्रकाली पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
Nashik Crime News:
Nashik Crime News:Saamtv

तबरेज शेख; प्रतिनिधी...

Nashik Robbery News: नाशिकमध्ये एका बड्या बिल्डरचे घरफोडल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. यामध्ये सोन्याचे दागिने आणि रोकड असा तब्बल आठ लाख ४२ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून पोलिस याबाबत अधिक तपास करत आहेत. (Crime News In Marathi)

Nashik Crime News:
Life Imprisonment : पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला आजन्म कारावास, वाचा नेमकं काय घडलं हाेतं आठवडी बाजारपेठेत

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकच्या (Nashik) काठे गल्ली भागात एका बिल्डर व्यावसायिकाचे घर फोडून रोकड आणि सोन्याचे दागिने असा तब्बल आठ लाख ४२ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. आनंद हिरे (Anand Hire) अस या तक्रारदार बिल्डरचे नाव आहे.

घरातील सदस्य काठे गल्लीतील टाकळी रोडवरील लॉन्स- मध्ये सुरू असलेल्या भागवत कथेसाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून रात्री पावणेआठच्या सुमारास त्यांच्या पत्नी घरी परतल्या. त्यावेळी घराच्या लोखंडी जाळ्या कापलेल्या आढळल्यानंतर त्यांनी तात्काळ पती आनंद हिरे यांना माहिती दिली.

Nashik Crime News:
Indapur Accident: इंदापूर विहीर दुर्घटना प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; विहीर मालकासह ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

दोघांनी घरात आत जाऊन पाहिले असता कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. कपाटातील सोन्याचे दागिने, मोत्याची बांगडी यांसह सहा लाखांची रोकड असा सुमारे आठ लाख ४२ हजारांचा ऐवज लंपास झाल्याचे लक्षात आले. त्यांनी घरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता सुमारे २५ ते ३० वर्षीय दोन संशयित तोंडास रुमाल बांधून घरात जाताना व बाहेर पडताना आढळून आले.

त्यांच्या हातात गज तोडण्याचे कुरूप तोडण्याचे हत्यार दिसून आले. याबाबत भद्रकाली पोलिसांना माहिती देताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. भद्रकाली पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलिस अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com