नाशिक: जिल्ह्यातील धरण क्षेत्रात 10 नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी!

गंगापूर, दारणा, मुकणे, भावली, वालदेवी, कडवा, नांदूरमध्यमेश्वरसह अन्य काही धरणांच्या क्षेत्रात जमावबंदी
नाशिक: जिल्ह्यातील धरण क्षेत्रात 10 नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी!
नाशिक: जिल्ह्यातील धरण क्षेत्रात 10 नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी!अभिजित सोनावणे

अभिजित सोनावणे

नाशिक: नाशिक Nashik जिल्ह्यातील धरणांच्या क्षेत्रात जमावबंदी Curfew आदेश लागू करण्यात आले आहेत. नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात आदेश काढले आहेत.

हे देखील पहा-

जिल्ह्यातील धरणं भरत आली असून अनेक धरणांमधून सध्या पाण्याचा विसर्गदेखील सुरु आहे. त्यामुळे गणपती विसर्जनासह आगामी नवरात्री आणि दिवाळी या सणांच्या पार्श्वभूमीवर धरणक्षेत्रात नागरिकांची गर्दी होऊन कोरोनाचा प्रसार होऊ नये तसंच धरणांची सुरक्षितताही अबाधित राहावी, यासाठी धरणांच्या क्षेत्रात 10 नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

नाशिक: जिल्ह्यातील धरण क्षेत्रात 10 नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी!
Yavatmal: हत्येचा थरार; दहा जणांच्या टोळीने केला तरुणाचा खून!

तसेच 5 अथवा 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. जिल्ह्यातील गंगापूर, दारणा, मुकणे, भावली, वालदेवी, कडवा, नांदूरमध्यमेश्वर, गौतमी गोदावरी, काश्यपी, आळंदी, भोजापूरसह अन्य काही धरणांच्या क्षेत्रात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेत.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com