Nashik Vidhan Parishad: नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी आज मतदान, पाच जिल्ह्यांत 338 मतदान केंद्रे तयार

नाशिक पदवीधर निवडणुकीत नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यात मतदान होणार आहे.
Voting
VotingSaam Tv

नाशिक : विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आज मतदान होत आहे. निवडणुकासाठी पाच जिल्ह्यांत 338 मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे.

नाशिक पदवीधर निवडणुकीतील सुरुवातीपासूनच ट्विस्ट पाहायला मिळाले आहेत. अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आणि महविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांच्यात थेट लढत होणार आहे. नाशिकसह अमरावती पदवीधर, औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षण मतदारसंघात देखील आज मतदान होणार आहे. (Latest News Marathi)

Voting
Odisha Health Minister Dies : ओडिशाचे आरोग्यमंत्री नाबा दास यांचं निधन; पोलीस कर्मचाऱ्याने केला होता गोळीबार

नाशिक पदवीधर निवडणुकीत नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यात मतदान होणार आहे. विभागात एकूण ३३८ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक १४७ मतदान केंद्र तर नाशिक जिल्ह्यात ९९ मतदान केंद्र आहेत. मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन देखील सज्ज झालं आहे.

Voting
Solapur News : लग्नाळू तरुणांनो सावधान! सोलापुरात बोगस वधू-वर सूचक मंडळ उघडकीस; युवकांची 'अशी' झाली फसवणूक

नाशिक विभागात एकूण २ लाख ६२ हजार ७३१ मतदार आज बजावणार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. अहमदनगर जिल्ह्यात १ लाख १५ हजार ६३८ मतदार, नाशिक जिल्ह्यात ६९ हजार ६५२, जळगाव जिल्ह्यात ३५ हजार ५८, धुळ्यात २३ हजार ४१२ तर नंदुरबार जिल्ह्यात १८ हजार ९७१ मतदार आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com