nashik leopard news file photo
nashik leopard news file photo saam tv

Nashik Leopard : नाशिकमध्ये घरात शिरून बिबट्याचा एकावर हल्ला; परिसरात भीतीचे वातावरण

नाशिकच्या (Nashik) म्हसरूळ शिवारात बिबट्याने (Leopard) घरात घुसून एकावर हल्ला केला आहे. बिबट्याने केलेल्या या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीवर नाशिकच्या सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरु आहेत

तबरेज शेख

Nashik Leopard News : नाशिकच्या (Nashik) म्हसरूळ शिवारात बिबट्याने (Leopard) घरात घुसून एकावर हल्ला केला आहे. बिबट्याने केलेल्या या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीवर नाशिकच्या सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सदर घटनेनंतर म्हसरुळ शिवारात राहणाऱ्या लोकांमध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे.

nashik leopard news file photo
Dombivali: हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पाठिंबा दिला, पण 'हे' खपवून घेणार नाही; मनसे आमदार राजू पाटलांचा सरकारला इशारा

नेमकं काय घडलं ?

निसर्गाच्या सानिध्यात राहणारा बिबट्या लोकांच्या वस्तीत धाव घेऊ लागल्याने नाशिकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे. नाशिक शहरआणि बिबट्या असं नव समीकरण झालं आहे. भारत याडकर हे मोराडे वस्ती,मोरे मळा, म्हसरूळ या ठिकाणी घरात झोपले असताना बिबट्या त्यांच्या घरात शिरला. त्यानंतर या बिबट्याने त्यांच्यावर केला. या हल्ल्यात याडकर यांच्या हाताला बिबट्याने चावा घेतला. आरडाओरडा केल्यानंतर बिबट्याने पळ काढला.

nashik leopard news file photo
विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी कुणाची वर्णी? उपसभापती नीलम गोऱ्हेंना दिलं पत्र

दरम्यान, बिबट्याच्या हल्ल्यात भारत याडकर जखमी झाले असून त्यांच्यावर नाशिकच्या सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बिबट्याच्या हल्ल्याने परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे. शहराला लागून असलेल्या पंचवटी, म्हसरूळ या दाट वस्तीच्या भागाला लागून असलेल्या ठिकाणी बिबट्याने हल्ला केल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. दरम्यान, याआधीही नाशिकच्या सातपूर एमआयडीसी परिसरात यश एंटरप्राइजेसजवळ बिबटयाचे दर्शन झाले होते. सदर बिबट्या हा परिसरातील सीसीसटीव्हीमध्ये कॅमेऱ्यात कैद झाला होता. या बिबट्यांचे आगमन शहरी वस्तीत वाढल्याने वन विभागाची देखील डोकेदुखी वाढली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com