Nashik: बनावट दारूचा कारखाना उध्वस्त; तब्बल 1 कोटींचा मुद्देमाल जप्त
Nashik: चांदोरीजवळ बनावट दारूचा कारखाना उध्वस्त; तब्बल 1 कोटींचा मुद्देमाल जप्तअभिजीत सोनावणे

Nashik: बनावट दारूचा कारखाना उध्वस्त; तब्बल 1 कोटींचा मुद्देमाल जप्त

बनावट दारू सह दारू बनवण्याचं साहित्य केलं जप्त, चक्क लॉन्समध्ये सुरू होता बनावट दारूचा कारखाना

नाशिक: नाशिक-औरंगाबाद मार्गावर चांदोरीजवळ बनावट दारूच्या कारखान्यावर मध्यरात्री छापेमारी करत पोलिसांनी बनावट दारूचा कारखाना उध्वस्त केला आहे. चांदोरीजवळ चक्क लॉन्समध्ये हा बनावट दारूचा कारखाना सुरू होता. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर रात्री स्वतः पोलीस अधीक्षकांनी उदयनराजे लॉन्सवर छापा टाकून ही धडक कारवाई केली.

या कारवाईत बनावट देशी दारूचे 2 हजार खोके, 15 हजार देशी दारूच्या रिकाम्या बाटल्या, 20 हजार लिटर स्पिरिट, देशी दारू बनवण्याचं साहित्य असा तब्बल 1 कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र चक्क लॉन्समध्ये अशा पद्धतीने बनावट दारूचा कारखाना चालवला जात असल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.