Makar Sankranti 2022: मकरसंक्रांतीनिमित्त येवल्यात पंतगोत्सवाची धूम

डीजेचा दणदणाट आणि वक्काट वक्काट च्या गगनभेदी आवाजांनी आसमंत दुमदुमला
Makar Sankranti
Makar Sankrantiअभिजीत सोनावणे

नाशिक - मकरसंक्रांतीनिमित्त (Makar Sankranti) आज येवल्यात पतंगोत्सवाची धूम पाहायला मिळते आहे. विविध आकाराच्या रंगीबेरंगी पतंगांनी शहरातलं आकाश व्यापून गेलं आहे. इमारतींच्या टेरेसवर बच्चेकंपनीपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण पतंग (Kite) उडवण्याचा आनंद लुटत असल्याचे दिसून येत आहे. सर्वांमध्ये एकमेकांच्या पतंग कापण्याची चढाओढ सुरू आहे. येवल्यात पतंग उत्सवाला गेल्या अनेक वर्षांची परंपरा असून संक्रांतीचे (Makar Sankranti) तीन दिवस येवल्यात पतंगोत्सव साजरा केला जातो. येवल्यातील पतंगोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे पतंग उडवण्यासाठी लागणारी आसारी. (Makar Sankranti festival Updates in Marathi)

हे देखील पहा -

या आसारीमुळे एकच व्यक्ती स्वतः पतंग उडवू शकतो. भोगीच्या दिवशी उत्सवाला सुरुवात झाल्यानंतर आज मकरसंक्रांतीला येवलेकर पतंगोत्सवात बेभान झाल्याचं दिसून आलं. 'वक्काट वक्काट'च्या गगनभेदी आवाजांनी येवल्यातील आसमंत दुमदुमून गेला. भोगी, संक्रांत आणि करीदिनी असे तीन दिवस येवल्यात मोठ्या उत्साहात पतंग उत्सव साजरा केला जातो. येवल्यातील पतंगोत्सवासाठी बाहेरगावाहूनही मोठ्या संख्येनं नागरिक येतात आणि 3 दिवस इथल्या पतंगोत्सवाचा आनंद लुटतात.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com