Satyajeet Tambe : ...म्हणून देवेंद्र फडणवीस यांना मोठ्या भावासारखा मानतो; सत्यजित तांबे स्पष्टच बोलले

नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे विजयी उमेदवार आमदार सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषद घेत संवाद साधला
Satyajeet Tambe News
Satyajeet Tambe News Saam tv

Satyajeet tambe News : नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे विजयी उमेदवार आमदार सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषद घेत संवाद साधला. या पत्रकार परिषदेत नाशिक नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या विजयावर भाष्य केलं. तसेच यावेळी सत्यजित तांबे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बंधूप्रेम व्यक्त केलं.

'पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजितवर डोळा आहे. मला संधी मिळत नाही, ही भावना भावना बोलून दाखवली. माझं आणि फडणवीसांचं जवळचं नातं आहे. देवेंद्र फडणवीस यांना मोठ्या भावासारखा मानतो, असे वक्तव्य सत्यजित तांबे यांनी केलं. (Latest Marathi News)

नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाचे विजयी उमेदवार आमदार सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत सत्यजीत तांबे म्हणाले, ' मला यापूर्वीच बोलायचं होतं. निवडुकीदरम्यान अनेक आरोप-प्रत्यारोप आमच्या कुटुंबावर झाले.आमच्या कुटुंबाला २०३० काँग्रेसमध्ये १०० वर्षे पूर्ण होत आहेत. किती निष्ठेने पक्षात काम केलं, हे वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला'.

'२००० साली काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात आलो. जिल्हा परिषद सद्यस्य म्हणून काम केलं. काँग्रेस आणि राहुल गांधींच्या विचारांवर विश्वास ठेवून युवक काँग्रेसची निवडणूक लढलो. युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष झालो. मी युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष झालो तेव्हा राज्यात काँग्रेसची परिस्थिती बिकट होती. युवक काँग्रेसच्या मध्यामतून पक्ष उभारणीचे काम केले', असेही तांबे पुढे म्हणाले.

Satyajeet Tambe News
Satyajeet Tambe Press Conference : विजयानंतर सत्यजित तांबेंची पहिली प्रतिक्रिया | SAAM TV

सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) पुढे म्हणाले, 'युवकच काँग्रेसला कसं पुढे आणू शकतो. यावर चर्चा केली. आंदोलनाच्या माध्यमातून माझ्यावर देशभरात ५० पेक्षा जास्त केसेस झाल्या. मी चळवळीतून आलेला कार्यकर्ता आहे. युवक काँग्रेसच्या (Congress) प्रदेशाध्यक्षपदी राहिलेल्या व्यक्तीला नंतर दुसरी पद दिली जातात. मात्र मला वडील आमदार असल्यानं संधी नाकारण्यात आली. आमदार, खासदार पदामध्ये रस नसलेला मी कार्यकर्ता आहे. संघटनेतून काम करण्याची संधी द्या, असं मी वारंवार सांगितलं'.

Satyajeet Tambe News
Satyajeet Tambe Car: सत्यजित तांबेचा 'कार'नामा, संपूर्ण निवडणुकीदरम्यान वापरलेल्या कारची जोरदार चर्चा

'वडिलांच्या जागेवर मला तिकीट देण्याचं एचके पाटील बोलले. तेव्हा मला संताप आला. मी २२ वर्षे पक्षासाठी काम केलंय. स्वतः च्या हिमतीवर काही करायचं या उद्देशाने मी काम करत होतो. मी पुस्तक प्रकाशनावेळी सर्वपक्षीय नेत्यांना बोलावलं. तिथे देवेंद्र फडणवीस बोलले की आमचा सत्यजितवर डोळा आहे. मला संधी मिळत नाही, ही भावना त्यांनी बोलून दाखवली. त्यानंतर महाराष्ट्रात एक नवी चर्चा सुरू झाली. माझं आणि फडणवीसांचं जवळचं नातं आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मोठ्या भावासारखा मानतो', असेही सत्यजित तांबे पुढे म्हणाले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com