Teachers Mobile Ban: शिक्षकांनो! वर्गात मोबाईल वापरताय? मग ही बातमी वाचा

Nashik Municipal Corporation Decision: पालिकेच्या शिक्षण विभागानं शिक्षकांच्या मोबाईल वापरावर बंदी केलीय.
Teachers Mobile Ban: शिक्षकांनो! वर्गात मोबाईल वापरताय? मग ही बातमी वाचा
प्रतिनिधीक फोटो, Saam Tv

Teachers Mobile Ban in Corporations School:

नाशिक महापालिकेच्या शिक्षण विभागानं शाळेत मोबाईल बंदीचा निर्णय घेतलाय. मोबाईल बंदीच्या निर्णयानुसार शिक्षकांना शाळेत मोबाईल इतर कामासाठी वापरत येणार नाहीये. शहरातील पालिकेच्या १०० हून अधिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दैनंदिन तासिकेत गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं. शिकवताना अडचण येऊ नये, म्हणून पालिकेच्या शिक्षण विभागानं शिक्षकांच्या मोबाईल वापरावर बंदी केलीय. (Latest News)

या निर्णयामुळे शिक्षकांना मोबाईल फोनचा वापर शाळेच्या आवारात किंवा वर्गात केवळ शैक्षणिक साधन म्हणूनच करता येईल. जर शिक्षकांना खूपच महत्वाचं काम असेल तर मोबाईल वापरण्यासाठी परवानगी घेणं आवश्यक असेल. पालिकेच्या निर्णयानंतर शिक्षकांमध्ये काहीशी नाराजी आहे. परंतु विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून हा निर्णय चांगला असल्याची प्रतिक्रिया शिक्षकांनी दिलीय.

काही अडचण असल्यास किंवा महत्त्वाचं काम असल्यास शिक्षकांनी संपर्क करायचा असेल तर मोबाईल वापरता येणार आहे.परंतु यासाठी शिक्षकांना मुख्यध्यापकांची परवानगी घ्यावी लागणार आहे. तर शाळेच्या कालावधीत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी मुख्याध्यापकांचा मोबाईल हाच एक संपर्काचा साधन असणार आहे. विशेष म्हणजे मोबाईल बंदीच्या निर्णयाच्या कठोर अंमबजावणीसाठी शाळेत आल्यानंतर शिक्षकांना त्यांचा मोबाईल जमा करावा लागणार आहे.

मोबाईल जमा केल्यांची नोंद शिक्षकांना करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे शाळेत शिकवत असताना मोबाईलची गरज भासल्यास मुख्याध्यापकांच्या पूर्वपरवानगी घ्यावी लागेल. त्यामुळे आता या निर्णयामुळे पालिका शाळांच्या गुणवत्तेत किती सुधारणा होते, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Teachers Mobile Ban: शिक्षकांनो! वर्गात मोबाईल वापरताय? मग ही बातमी वाचा
Nashik Heavy Rain: नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस; गिरणा नदीवरील लहान पूल पाण्याखाली

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com