नाशिकमध्ये धोकादायक वाडे, इमारतींचा प्रश्न ऐरणीवर; महापालिकेने उचलले 'हे' पाऊल

वारंवार नोटिसा बजावूनही नागरिक धोकादायक इमारती नागरिक रिकाम्या करत नसल्याने वीज आणि पाणी खंडित करण्याचा निर्णय महापालिकेकडून घेण्यात आला आहे.
nashik municipal corporation
nashik municipal corporation saam tv

नाशिक : नाशिक (Nashik) शहरातील धोकादायक वाड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नाशिक महापालिकेने शहरातील ११४९ धोकादायक वाडे आणि इमारतींना अंतिम नोटिसा जारी केल्या आहेत. तर वीज आणि पाणी खंडित करण्याच्या देखील नोटिसा जारी केल्या आहेत. वारंवार नोटिसा बजावूनही नागरिक धोकादायक इमारती नागरिक रिकाम्या करत नसल्याने वीज आणि पाणी खंडित करण्याचा निर्णय महापालिकेकडून घेण्यात आला आहे. (Nashik News In Marathi )

nashik municipal corporation
उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का! आजी-माजी आमदार 'पिता-पुत्र' एकनाथ शिंदे गटात सामील ?

जुन्या नाशकात वाड्याची भिंत कोसळल्यानंतर महापालिका प्रशासन ऍक्शन मोडमध्ये आली आहे. नाशिकमध्ये दरवर्षी पावसाळ्यात जुन्या आणि धोकादायक वाडे आणि इमारतींचा प्रश्न ऐरणीवर येतो. यंदाही तशीच परिस्थिती असून महापालिकेनं शहरातील ११४९ धोकादायक वाडे आणि इमारतींना वीज आणि पाणी खंडित करण्याच्या अंतिम नोटिसा पाठवल्या आहेत. यापैकी अतिधोकादायक असलेल्या ७५ पैकी २० वाडे आणि इमारतींचा वीज आणि पाणीपुरवठा खंडितही करण्यात आला आहे. धोकादायक वाडे आणि इमारतींमधील नागरिकांनी स्वतः हून ते खाली न केल्यास पालिका प्रशासनाकडून ते रिकामे करून घेतले जातील, असा इशाराही पालिका प्रशासनाने दिला आहे.

nashik municipal corporation
कॉमेडी एक्सप्रेस सिझन १ मुंबईत झाला, दुसरा दिल्लीत सुरू; राऊतांचा शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल

दरम्यान, दरवर्षी पावसाळ्यात धोकादायक वाडे आणि इमारतींना नोटिसा बजावण्याचे सोपस्कार पार पाडले जातात. मात्र, नोटिसा बजावूनही नागरिक घर रिकामे करत नसल्याने अखेर पालिका प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. त्यातच मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जुन्या नाशिकमधील एका जुन्या वाड्याची भिंत कोसळून २ जण जखमी झाल्यानंतर प्रशासन ऍक्शन मोडमध्ये आली आहे. लवकरात लवकर धोकादायक इमारती रिकाम्या करून घेण्याचा पालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com