Gutkha Seized In Nashik: १७ लाखांचा प्रतिबंधीत गुटखा जप्त

17 Lakhs of Restricted Gutkha Seized In Nashik: १७ लाखांचा प्रतिबंधीत गुटखा जप्त
Nashik News
Nashik NewsSaam tv

तबरेज शेख

नाशिक : नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील वडाळा (Nashik) गावात पोलिसांनी छापा टाकत सुमारे १७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Police) तिघांना अटक केली असून दोघे फरार आहे. (Tajya Batmya)

Nashik News
Bribe Trap: गुलाब रुतला लाचेच्या काट्यात; जन्‍माच्‍या नोंदीसाठी ग्रामसेवक अडकला

नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या मोठ्या कारवाईची संपूर्ण वडाळा परिसरात दिवसभर चर्चा सुरू होती. रोहान अन्वर शेख (वय २८), शोएब इकबाल पटेल (वय ३३), मोहम्मद गुफराण कुतुबुद्दीन खान (वय २२) आणि असद जाकीर सय्यद यांनी १७ लाख १५ हजार ६२५ रुपये किंमतीचा जयका १०००० या कंपनीच्‍या गुटख्‍याचे प्रत्येकी ७५ पुड्यांचे पाकिटे असलेल्या १५२५ किलोग्राम वजनाच्या १०८ गोण्या बाळगल्या. सेंट सादिक शाळा परिसरातील सालार रोहाऊसेसच्या मागील परिसरात लपवून ठेवल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.

Nashik News
Chalisgaon Crime News: नात्‍याला काळीमा..पत्‍नी आजारी असताना जन्‍मदात्‍या बापानेकडून नऊ वर्षीय मुलीवर अत्‍याचार

उघड्यावर फेकून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न

संशयीत जाकीर सय्यद याने नमूद वर्णनाचा व किमतीचा गुटख्याचा माल महाराष्ट्रात बंदी असताना चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने रोहान शेख याच्या मदतीने साठवून ठेवला होता. मात्र पोलिसांनी गोपनीय खबर मिळताच कारवाईच्या भीतीने त्याने मुद्देमाल उघड्यावर फेकून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करून तीन जणांना अटक केली आहे. वरिष्ठ निरीक्षक गणेश न्हायदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com