
Nashik: उसने घेतलेले पैसे परत करण्यासाठी तगादा लावल्याने २४ वर्षीय युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हर्षल संजय गायकवाड (वय २४) रा.विद्यानगर, देवळा (नाशिक) असे या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी देवळा पोलिसांनी संशयित दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एकास अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणात दुसऱ्याचा शोध सुरू आहे. (Latest Marathi News)
याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय हरी गायकवाड (रा. विद्यानगर,) यांनी संशयित आरोपी प्रवीण सदाशिव आहेर रा.तीसगाव, ता. देवळा व अमोल निकम रा.दाभाडी ता.मालेगांव यांचेकडून २१ लाख रुपये उसने घेतले होते. त्याबदल्यात हर्षल गायकवाडने या दोघांना तीन चेक दिले होते. मात्र खात्यावर पैसे नसल्याने हे चेक वटले नाहीत. यामुळे या दोघांनी फिर्यादीचा मुलगा हर्षल संजय गायकवाड यास प्रत्यक्ष भेटून तसेच मोबाईलवर वारंवार धमकी देत पैशांचा तगादा लावला.
या त्रासाला कंटाळून हर्षल याने शनिवार ( ता.११) रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास राहत्या घरी कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. संजय गायकवाड यांना हर्षल हा एकुलता एक मुलगा होता. अत्यंत हुशार असलेल्या हर्षलच्या निधनाने देवळा शहर व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (Nashik News)
या प्रकरणात देवळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी रात्री उशिरा प्रवीण आहेर या संशयित आरोपीला अटक केली असून दुसऱ्याचा पोलीस शोध घेत आहेत. घटनास्थळी पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांनी भेट दिली असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक महेश शिंदे करीत आहेत. (Crime News)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.