Leopard Attack: बिबट्याच्या हल्ल्यात ३ वर्षीय बालिकेचा मृत्‍यू

बिबट्याच्या हल्ल्यात ३ वर्षीय बालिकेचा मृत्‍यू
Leopard Attack
Leopard AttackSaam tv

तबरेज शेख

नाशिक : नाशिकमध्ये बिबट्याचे हल्ले सुरुच आहेत. या पुन्हा एकदा बिबट्याच्या (Leopard) हल्ल्यात एका चिमुकलीचा जीव गेला आहे. बिबट्याच्‍या हल्‍ल्‍यात (Leopard Attack) जखमी झालेल्‍या तीन वर्षीय बालिकेचा मृत्‍यू झाला आहे. (Tajya Batmya)

Leopard Attack
Dhule News: धुळ्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस

त्र्यंबकेश्वर (Nashik News) तालुक्यातील मौजे ब्राह्मणवाडे येथील नवशु पांडुरंग कोरडे यांच्या गट नंबर 331 मध्ये कोरडे दाम्पत्य राहते. यावेळी त्यांच्या घराजवळील ओट्यावर त्यांची ३ वर्षीय मुलगी नयना नवशु कोरडे ही खेळत होती. याचवेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने या चिमुकळीवर हल्ला चढवला. बिबट्याच्या या अचानक केलेल्या हल्ल्यात नयना ही गंभीर जखमी झाली.

रूग्‍णालयात केले दाखल

बिबट्याच्‍या हल्‍ल्‍यातून नयना हिची तिच्‍या पालकांनी आरडाओरड केल्‍याने सुटका झाली. यानंतर ३ वर्षीय नयना हिला जखमी अवस्‍थेत रूग्‍णालयात दाखल केले. मात्र नयना हिचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच हळ हळ व्यक्त केली जात आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com