Nashik News: भयंकर! घुशीने हात कुरतडला; उपचारादरम्यान आजीबाईंचा दुर्देवी मृत्यू

Nashik News Update: महिलेच्या अशाप्रकारचा मृत्यू झाल्याने संवेदनशील नागरिकांत हळहळ व्यक्त केली जात आहे.
Nashik News
Nashik NewsSaamtv

तबरेज शेख, प्रतिनिधी...

Nashik News: घुशीने पंजा कुरतडल्याने वयाेवृद्ध महिला जखमी झाल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या (Nashik) गंजमाळ परिसरात घडली आहे. या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून तिच्या मेंदूला सूज आल्याने तसेच फुफ्फुस निकामी झाल्याने नैसर्गिक मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी स्पष्ट केले आहे. गयाबाई गायखे (वय, ८६) असे मृत महिलेचे नाव असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

Nashik News
Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं! जन्मदात्या बापानेच दोन मुलांना विहिरीत फेकले, एकाचा बुडून मृत्यू

याबाबत अधिक माहिती अशी की, गंजमाळ झाेपटपट्टी परिसरात काही महिन्यांपासून महापालिकेच्या वतीने भूमिगत गटारीचे काम अधर्वट सोडण्यात आले आहे. त्यामुळे त्यातील घूस किवा चुचुंद्री बाहेर येऊन तिने गयाबाई यांचा पंजा कुरतडल्याने त्या घरात पडून हाेत्या. परिसरातील नागरिकांनी गयाबाई यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी गयाबाई यांचे शवविच्छेदन केले.

ज्यामध्ये मृत्यू फुफ्फुस संसर्गासह मेंदूला सूज आणि बेडपाॅक्स हाेऊन झाल्याचे शवविच्छेदन कक्षप्रमुख डाॅ. श्रावण गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. गयाबाई मरणासन्न अवस्थेत दिवस कंठत हाेत्या. याबाबत आकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे.

Nashik News
Mumbai Pune Expressway : मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबचलांब रांगा, नागरिकांचा खोळंबा

नागरिकांनी व्यक्त केला संताप....

दरम्यान, या दुर्देवी घटनेनंतर नागरिकांमधून संताप व्यक्त केला असून उघड्या गटारी व त्यातून डास, मच्छर वाढले आहेत. ढापे उघडे असल्याने घूस व चुचुंद्रींचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे परिसरातील उघड्या गटारीचे काम त्वरित पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.

तसेच सामान्यांतील सामान्यांच्या वाटेला असे दुर्दैवी जगणं येणं यापेक्षा वाईट काहीच नाही. स्थानिक नगरसेवक हे निवडणूक काळात मदत करून स्वार्थ साधतात. इतरवेळी कोणालाही या लोकांच्या जीवनाशी देणघेणे नसते. ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे, अशा शब्दात नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. (Crime News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com