Nashik News
Nashik NewsSaam Tv

Nashik News : फायर ऑडिट नसणाऱ्या इमारती होणार सील! महापालिकेचा इशारा

15 फेब्रुवारीपर्यंत अहवाल सादर करण्याची मुभा

Nashik Fire Audit : नाशिक महानगर पालिकेच्या हद्दीत असलेल्या शासकीय आणि निमशासकीय कार्यालय आणि इतर खाजगी आस्थापनात अद्यापही फायर ऑडिट न झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Nashik News
Maharashtra Cabinet Expansion : शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच, कोणत्या नेत्याला मिळणार मंत्रिपद? नेत्यांमध्ये चुरस

नाशिक (Nashik) महानगर पालिकेच्या अग्निशमन विभागाने अनेकदा नोटीस पाठवूनही फायर ऑडिट केले जात नसल्याची बाब पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे नाशिक नाशिक शहरातील फायर ऑडिट (Fire Audit) नसणाऱ्या इमारती सील केल्या जाणार आहेत. त्याआधी 15 फेब्रुवारीपर्यंत फायर ऑडिटचा अहवाल सादर करण्याचा अल्टिमेटम महापालिकेकडून देण्यात आला आहे.

शहरातील शासकीय, निम शासकीय कार्यालये, हॉटेल्स, रुग्णालये, शैक्षणिक, सार्वजनिक, व्यावसायिक, औद्योगिक इमारती आणि १५ मीटरपेक्षा उंच रहिवाशी इमारतींना फायर ऑडिट करून उपाययोजनांचा दाखल सादर करण्याचं अल्टिमेटम देण्यात आलं आहे.

Nashik News
Mumbai News: सांताक्रुझमधील सोनसाखळी चोरांचा पर्दाफाश; सापळा रचत पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अहवाल सादर न करणाऱ्या इमारतींचा पाणीपुरवठा आणि वीजपुरवठा खंडित केला जाणार असून पोलिसांच्या (Police) मदतीने इमारती सील करण्याचा इशारा देण्यात आलाआहे. त्या व्यतिरिक्त भविष्यात दुर्घटना घडल्यास दखलपात्र व अदखलपात्र अपराध म्हणून नोंद देखील केली जाईल, अशी माहिती समोर आली आहे.

वर्षत दोनवेळा फायर ऑडिट करण्याचा नियम आहे. त्यासाठी नाशिक महानगर पालिकेच्या वतिने नोटिसा दिल्या जातात, मात्र फायर ऑडिट केले जात नसल्याने पालिकेच्या अग्निशमन विभागाने आक्रमक भूमिका घेतली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com