Nashik News: मोठी बातमी! अखेर वीस तासानंतर बेपत्ता जवानाचा मृतदेह सापडला, कुटूंबियांचा आक्रोश; संपूर्ण गावावर शोककळा

या दुखःद घटनेने गावावर शोककळा पसरली असून पाटाचे पाणी लवकर बंद न केल्याने ग्रामस्थ व जवानाच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे....
Ganesh Gite
Ganesh GiteSaam TV

Nashik Sinner News: केंद्रीय राखीव सुरक्षा बलातील जवानाचा अपघातानंतर बेपत्ता झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली होती. ज्यानंतर सर्वत्र खळबळ माजली होती. शिर्डीवरून साईबाबांचे दर्शन घेऊन परत येत असताना ही घटना घडली होती. यावेळी जवानासोबत पत्नी आणि दोन मुलेही होती. अपघात झाल्यानंतर पत्नी आणि मुलांना स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. मात्र जवान गणेश गिते वाहून गेले होते.

गेल्या २० तासांपासून त्यांचा शोध सुरू होता. पालकमंत्री पालकमंत्री दादा भुसे यांनी मदतकार्यासाठी एक तासापासून घटनास्थळी थांबले होते. अखेर, साडे वीस तासानंतर अर्धा किमी अंतरावर बेपत्ता जवानाचा मृतदेह सापडला आहे. (Latest Marathi News Update)

Ganesh Gite
Sharad Pawar : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी शरद पवार मैदानात; काय-काय सांगितलं?

नाशिकच्या सिन्नर तालुक्यात गोदावरी कालव्यात वाहून गेलेल्या जवानाचे नाव गणेश सुखदेव गिते असं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या विशेष पथकात ते तैनात असतात. २४ फेब्रुवारी रोजी गणेश गिते हे सुट्टीवर आले होते. घराच्या काही मीटर अंतरावर आले असतानाच दुचाकीचा अपघात होऊन ते गोदावरीच्या उजव्या कालव्यात पडले. अपघात झाल्याची बाब लक्षात येताच स्थानिकांनी धाव घेत गणेश गिते यांच्या पत्नी आणि मुलांना बाहेर काढले. दरम्यान, पाण्याच्या प्रवाहामुळे ते वाहून गेले.

Ganesh Gite
Ajit Pawar: शेतकरी आत्महत्यांवरुन अजित पवार संतापले! कोणाच्या सरकारमध्ये किती आत्महत्या; आकडेवारीच सांगितली

या दुखःद घटनेने कुटूंबियांनी मोठा आक्रोश केला असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. जोपर्यंत बेपत्ता जवानाचे सापडत नाही तोपर्यंत आपण स्वतः इथेच थांबणार असल्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितले होते. अखेर, साडे वीस तासांच्या प्रयत्नानंतर जवानाचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, पाटाचे पाणी लवकर बंद न केल्याने ग्रामस्थ व जवानाच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे. (Nashik News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com