Bribe Trap: तहसील कार्यालयातील वाहन चालकाने घेतली लाच; दीड लाखांची लाच स्वीकारताना अटक

तहसील कार्यालयातील वाहन चालकाने घेतली लाच; दीड लाखांची लाच स्वीकारताना अटक
Bribe Trap
Bribe TrapSaam tv

तबरेज शेख

नाशिक : नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील तहसील कार्यालयातील वाहन चालकाला दीड लाखांची लाच स्वीकारताना (ACB) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (Letest Marathi News)

Bribe Trap
Sangli News: वाऱ्याने एक एकर क्षेत्रातील द्राक्षबाग भुईसपाट; शेतकऱ्याचे दहा लाखाचे नुकसान

तक्रारदाराने मौजे शिरसाठे तालुका इगतपुरी येथे गट क्रमांक १७६ मधील शेतजमीन विकत घेण्यासाठी विसारपावती नोटरी केली होती. शेतजमीन संदर्भात तात्कालीन उपविभागीय अधिकारी इगतपुरी त्र्यंबकेश्वर येथे वाद चालू होता. या वादाचा निकाल तक्रारदार यांच्या बाजूने करून दिल्याच्या मोबदल्यात २ लाख रुपयांची लाच (Bribe) मागितली होती. त्यापैकी ५० हजार रुपये दिले होते. त्यानंतर उरलेली दीड लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना वाहन चालक अनिल बाबुराव आगीवले (वय ४४) नेमणूक तहसील कार्यालय त्र्यंबकेश्वर संलग्न उपविभागीय कार्यालय इगतपुरी त्र्यंबकेश्वर यास (Nashik News) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले.

यापुर्वीही घेतली होती लाच

विशेष म्हणजे यापूर्वी देखील या वाहन चालकाने ५० हजारांची लाच घेतली होती. दरम्यान, ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे- वालावलकर, अपर अधीक्षक नारायण न्याहाळदे, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप साळुंखे, हवालदार पंकज पळशीकर, प्रकाश महाजन, नितीन कराड, प्रभाकर गवळी यांच्या पथकाने केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com