Nashik News : सावधान! नाशिकमध्ये १ कोटींचं भेसळयुक्त खाद्यतेल जप्त; एफडीएची मोठी कारवाई

खाद्यतेल आणि वनस्पती तुपाचे ३२ नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत.
Nashik News
Nashik NewsSaam TV

नाशिक : नाशिकमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. नाशकात अन्न आणि औषध विभागाने वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करत तब्बल १ कोटींचं खाद्यतेल जप्त केलं आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात निकृष्ट आणि भेसळयुक्त दर्जाचे खाद्य तेल जप्त करण्यात आले आहे. पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करत ही कारवाई केली आहे. (Nashik Latest News)

Nashik News
केदार दिघेंना मुंबई सत्र न्यायालयाने केला अटकपूर्व जामीन मंजूर

नाशिकमध्ये उच्च प्रतीचे खाद्यतेल असल्याचं भासवून कमी दर्जाचं तेल ग्राहकांच्या माथी मारलं जात असल्याचा संशय अन्न आणि औषध विभागाला होता. यावेळी त्यांनी छापा टाकून ही कारवाई केली आहे. प्राप्त माहितीनुसार, शिंदे गावाजवळच्या माधुरी रिफायनर्स कारखान्यावर अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाचा छापा टाकला.

यावेळी तेलाच्या डब्यांवर फोर्टीफाइड तेलाचा उल्लेख प्रत्यक्षात मात्र पल्स एफ चा सिम्बॉल नसल्याचं समोर आलं आहे. या छाप्यात १ कोटी १० लाख ११ हजार २८० रुपयांच्या खाद्य तेलाचा साठा जप्त करण्यात आला आहे.खाद्यतेल आणि वनस्पती तुपाचे ३२ नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. (Nashik Todays News)

Nashik News
ED: एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा केला दाखल

नागरिकांना उत्तम दर्जाचे खाद्य पदार्थ मिळावे यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभाग विविध दुकानांवर छापेमारी करतात. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी कारवाईचा फास आवळला आहे.नुकतंच एफडीएतर्फे निकृष्ट आणि भेसळयुक्त दर्जाचे खाद्य तेल जप्त करण्यात आले आहे. यावेळी अन्न शिजवण्यासाठी गृहिणी जे तेल वापरतात, त्यातील सुमारे 50 टक्के तेल वापरण्यास योग्य नसून ते भेसळयुक्त होते. अन्न आणि औषध प्रशासनाच्या तपासणीत ही गंभीर बाब उघड झाली आहे.

दरम्यान, आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाने केलेली ही मोठी कारवाई आहे. खाद्यतेलात मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याने सर्वसामान्य जनतेने खाद्यतेल खरेदी करताना सावधानता बाळगावी, असे आवाहन एफडीएतर्फे करण्यात आले आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com