
Nashik Crime News: नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत दोन अल्पवयीन मुलांनी एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या केली आहे. दारू पिण्यासाठी हा इसम दोन अल्पवयीन मुलांकडे पैशांची मागणी करत होता. त्यामुळे दोघांनी त्याच्या डोक्यात दगड घातला. (Latest Nashik Crime News)
मिळालेल्या माहितीनुसार, शरदचंद्र पवार मार्केट ते मखमलाबाद लिंक रोड येथील नाल्यात या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. त्यावर पोलिसांनी कुशलतेने चौकशी आणि तपासाचा वेग वाढवला. त्यामुळे पुढे या प्रकरणात गावातील दोन अल्पवयीन मुलांनी त्या व्यक्तीची हत्या केल्याचे समजले आहे.
मयत व्यक्तीची ओळख पटल्यानंतर त्याच्या खुनाचा उलगडा देखील अत्यंत शिताफीने आणि कुशलतेने पोलिसांनी केला आहे. दारूला पैसे मगितल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून हा खून दोघा अल्पवयीन विद्यार्थ्यांनी केल्याचे पोलीस तपासात सामोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश भालेराव असं मयत इसमाच नाव असून तो सातपूर येथील रहिवासी होता. आरोपी दोन अल्पवयीन मूलं हे आपल्या मित्राला सातपूर येथे सोडण्यासाठी गेले होते. तेथून घटनेच्या रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास ते घरी परतत होते. त्यावेळी ऋषीकेशने त्यांच्याकडे पंचवटी परिसरातील हमालवाडी पाटा जवळ सोडा असे सांगत लिफ्ट मागितली.
त्यांनतर संशयित अल्पवयीन मुलांनी त्याला शरदचंद्र पवार मार्केट ते मखमलाबाद लिंक रोड येथील हमालवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सोडले यावेळी मयत ऋषिकेश याने लिफ्ट देणाऱ्या दोन्ही अल्पवयीन मुलांकडे दारूसाठी पैसे मागितले. यात त्यांनी ऋषिकेशला दारूसाठी पैसे देण्यास नकार दिला. मात्र पैसे न दिल्याने त्याने वाद घालायला सुरूवात केली. नंतर हा वाद पुढे हाणामारीमध्ये बदलला. या हाणामारीत दोन्ही संशयीत अल्पवयीन मुलांनी ऋषिकेशच्या डोक्यात दगड मारून त्याचा खून करून पळ काढला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांनतर कुठलाही पुरावा नसताना पोलिसांनी कौशल्य वापरत या खुनाचा उलगडा केला आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.