Nashik News: विवाह पार पडणार तोच झाली पहिलीची एन्‍ट्री; तरुणाची वरात थेट पोलीस ठाण्यात

विवाह पार पडणार तोच झाली पहिलीची एन्‍ट्री; तरुणाची वरात थेट पोलीस ठाण्यात
Nashik News
Nashik NewsSaam tv

तबरेज शेख

नाशिक : नवरदेव वऱ्हाडी मंडळीसह सर्वजण दाखल झाले. विवाह सोहळ्याची तयारी पूर्ण झाली होती. अन्‌ पोलिसांसह (Police) तिचीही अचानकपणे मंडपामध्ये एन्ट्री केली. सलग चार वर्षे लैंगिक अत्याचार करून तिला फसवून दुसऱ्या युवतीशी लग्न (Marriage) करणाऱ्या तरुणाची वरात थेट पोलीस ठाण्यात नेण्यात आली. यानंतर आज कोर्टात हजर केले असता कोर्टाने नवरदेवाला एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. (Breaking Marathi News)

Nashik News
Junnar News: प्रेमसंबंधातून विवाह नियोजित; मंडपात नवरी मुलीला आला संताप अन्‌ दोन्‍ही कुटूंब पोहचले पोलिसात

पंकज शरद कदम (रा. देवळाली गाव, नाशिक रोड) याने फिर्यादी पीडिता मुलीच्या ओळखीचा फायदा घेऊन ४ एप्रिल २०१९ ते १८ मे २०२३ या कालावधीत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या दरम्यान पंकज कदम याचा राहता येथील उच्चशिक्षित मुलीशी विवाह ठरला होता. राहता येथे नवरदेव वऱ्हाडी मंडळीसह सर्वजण दाखल झाले. विवाह सोहळ्याची तयारी पूर्ण झाली होती. अन्‌ पोलिसांसह (Nashik) तिचीही अचानकपणे मंडपामध्ये एन्ट्री केली. सोबत फिर्यादी पीडित महिलेने लग्नस्थळी दाखल होत आमचे प्रेमसंबंध असून लग्नाचे आमिष दाखवून पंकज कदम याने अनेकदा लैंगिक अत्याचार केले व माझी फसवणूक केली अशी तक्रार राहता पोलिसात केली.

वरातीतून नवरदेवाला उचलले

पोलिसांनी तक्रारीची दखल घेत नवरदेव पंकजला ताब्यात घेतले. आशीर्वाद प्राप्त होण्यास काही मिनिटांचा अवधी असतानाच पंकजला राहता पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि लग्नासाठी आलेल्या वधू-वरांकडे वराडीमध्ये गोंधळ उडाला. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून राहता पोलिसांनी चालू मिरवणुकीतून नवरदेवाला थेट पोलीस ठाण्यात नेले. घोडीवर चढण्याऐवजी नवरदेवाला पोलिसांनी ठाण्याची पायरी चढवली.

Nashik News
Bhusawal News: तापी नदीत पोहायला गेलेल्‍या पाच तरुणांपैकी दोघांचा मृत्यू; तिघांचा वाचला जीव

एक दिवसांची पोलिस कोठडी

या प्रकरणी प्रथम राहता पोलीस ठाण्यात महिलेवर चार वर्षे लैंगिक अत्याचार करणाऱ्या पंकज कदम यांच्या विरुद्ध फसवणुकीचा आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र फिर्यादी आणि आरोपी नाशिकमध्ये राहणारे असून त्यामुळे झिरो नंबरने दाखल केला. गुन्हा नाशिक रोड पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आलं. नाशिक रोड पोलिसांनी आरोपीला आज कोर्टात हजर केले असता कोर्टाने एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे .पुडील तपस नाशिक रोड पोलिस करत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com