Nashik News : महिला सरपंचाला सदस्याकडून मारहाण; मारहाणीचा व्हिडिओ आला समोर

Nashik News : महिला सरपंचाला सदस्याकडून मारहाण; मारहाणीचा व्हिडिओ आला समोर
Nashik News
Nashik NewsSaam tv

तबरेज शेख 
नाशिक
: नाशिकरोड येथून जवळच असलेल्या पळसे ग्रामपंचायतच्या (Grampanchayat) महिला सरपंचाला महिला (Nashik) सदस्याने राजीनामा देण्याच्या कारणावरून मारहाण केली. मारहाणीचा व्हिडिओ समोर आला आहे. याबाबत महिला सरपंचणे नाशिकरोड पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. (Tajya Batmya)

Nashik News
Jalgaon News : रात्री कुटुंबासोबत जेवण, गप्पा; सकाळी रुममध्ये गेल्यावर कुटुंब हादरले

नाशिक जिल्ह्यातील पळसे ग्रामपंचायतीची निवडणूक अडीच वर्षापूर्वी पार पडली. या निवडणुकीत विष्णू गायखे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या परिवर्तन पॅनलने १७ पैकी १२ जागांवर विजय मिळवला, तर जगन आगळे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या विकास पॅनलने पाच जागा जिंकल्या. राजकीय खलबते होऊन परिवर्तन (Sarpanch) पॅनलच्या प्रिया दिलीप गायधनी, ताराबाई होणाजी गायधनी यासह तीन सदस्यांनी विकास पॅनलला समर्थन देत सत्ता स्थापनेचा दावा केला होता. 

Nashik News
NCP News: राज्य सरकारच्या कंत्राटी धोरणाला विरोध; राष्ट्रवादीकडून जळगाव, धुळ्यात आंदोलन

सदस्याकडून राजीनाम्याची मागणी  

ग्रामपंचायतीत १७ पैकी १० जागा विकास पॅनलकडे असल्यामुळे पहिल्या आठ महिन्याकरिता सुरेखा गायधनी या सरपंच पदी विराजमान झाल्या. त्यानंतर सुशिक्षित व उच्चशिक्षित प्रिया दिलीप गायधनी यांची सदस्यांनी सरपंच पदी निवड केली. गावाचा कारभार व विकास कामे प्रिया गायधनी यांनी पळसे गावात (Police) आणली. मात्र त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी ताराबाई गायधनी या सदस्य महिला वारंवार करत होत्या

कार्यालयात येत मारहाण 
दरम्यान आज सकाळी सरपंच प्रिया गायधनी या ग्रामपंचायत कार्यालयात कामकाज करीत असताना महिला सदस्य ताराबाई होणाजी गायधनी यांनी कार्यालयात आल्या. यावेळी त्यांनी 'तुम्ही राजीनामा द्या' या कारणावरून वाद घालत सरपंच प्रिया गायधनी यांना मारहाण केली. यामुळे ग्रामपंचायत कार्यालयात मोठा गदारोळ झाला. काही ग्रामस्थ व सरपंच यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या घटनेमुळे शहर व जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com