Saptasrhungi Gad: सप्तशृंगी देवीच्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी; गडावरील रोपवे दोन दिवसांसाठी बंद

Nashik News : सप्तशृंगीच्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी; गडावरील रोपवे दोन दिवसांसाठी बंद
Saptasrhungi Gad
Saptasrhungi GadSaam tv

नाशिक : साडेतीन शक्तीपीठ पैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावर भाविकांच्या सोयीसाठी रोपवे (Nashik) तयार करण्यात आलेला आहे. मंदिरात जाण्यासाठी असलेला हा फ्युनिक्युलर रोपवे दोन दिवस बंद राहणार आहे. यामुळे (Saptashrungi Gad) भाविकांना दोन दिवस पायऱ्या चढून गडावर देवीच्या दर्शनाला जावे लागणार आहे. (Maharashtra News)

Saptasrhungi Gad
Shahada News: दूध भेसळ विरोधात धडक; शहाद्यात एका डेअरी चालकावर गुन्हा

नाशिक जिल्ह्यातील साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावर भाविकांची मोठी गर्दी होत असते. या गडावर येणाऱ्या भाविकांसाठी २०१८ मध्ये फ्युनिक्युलर ट्रॉलीचा प्रारंभ करण्यात आला आहे. या फ्युनिक्युलर रोपवेमुळे भाविकांना लवकर दर्शनासाठी गडावर जात येणे शक्य होत असते. सप्तशृंगीच्या दर्शनासाठी येणारे वृद्ध, दिव्यांग, महिला, रुग्ण भाविक, तसेच लहान मुलांना सहजपणे दर्शन घेण्याची सशुल्क सुविधा प्राप्त झाली आहे. 

Saptasrhungi Gad
ACB Trap: पाच हजाराची लाच; रेल्वे अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात

दोन दिवस राहणार बंद 

मंदिरात जलद जाता- येता यावे, या दृष्टीने भाविक रोपवेचा वापर अधिक प्रमाणात करत असतात. दरम्यान, १३ व १४ सप्टेंबर असे दोन दिवस रोपवेच्या पूर्व नियोजित तांत्रिक देखभाल व दुरुस्तीसाठी रोपवे बंद ठेवण्यात येणार आहे. या दोन दिवसात भाविकांना पायऱ्यानीच वर चढावे लागणार आहे. मात्र शुक्रवार (१५ सप्टेंबर) रोपवेची सेवा पूर्ववत केली जाणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com