Nashik News : नाशिककरांची चिंता वाढवणारी; ४ बालकांमध्ये आढळली गोवरची लक्षणं

नाशिककरांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुंबई मालेगाव पाठोपाठ आता नाशिकमध्येही गोवरने शिरकाव केला आहे.
Measles Disease
Measles DiseaseSaam Tv

Nashik News : नाशिककरांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुंबई मालेगाव पाठोपाठ आता नाशिकमध्येही गोवरने शिरकाव केला आहे. शहरात गोवरचे ४ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. या चारही संशयित रुग्णांमध्ये बालकांचा समावेश आहे. शहरात अचानक गोवरने शिरकाव केल्याने महापालिका आरोग्य विभाग अलर्टवर आलाय. चारही बालकांच्या रक्ताचे नमुने मुंबईला प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

मुंबईमध्ये सुरू असलेली गोवरची साथ मालेगाव शहरापर्यंत पोहोचली होती. मालेगाव शहरातील ४४ लहान मुलांना गोवर साथीच्या आजाराने ग्रासले असून ते महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल झाल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. आता मालेगावपाठोपाठ नाशिकमध्येही चार बालकांना गोवरची संशयित लक्षणे दिसून आली आहे.

या चारही बालकांच्या रक्ताच्या नमुन्यांच्या अहवाल आल्यानंतर शहरात बालकांची स्वतंत्र तपासणी मोहीम राबवण्याची आरोग्य विभागाने तयारी केली आहे. ज्या बालकांना गोवर प्रतिबंधक लसीकरण झालेले नसेल त्यांना संबंधित पालकांनी तत्काळ लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन नाशिक आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

मुंबईत गोवरने घेतला दहावा बळी

मुंबईत गोवरचा वाढता प्रादुर्भाव कायम असून गोवरने आणखी एक बळी घेतला आहे. गोवंडीतील एका सव्वा वर्षाच्या मुलीचा गोवरने मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईत गोवरने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता १० वर पोहचली आहे. सोमवारी मुंबईमध्ये २४ नवे रुग्ण आढळून आले असून, रुग्णांची संख्या २०८ झाली आहे. तसेच सोमवारी २२ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com